मोदींची पत्नीही दिसणार मोठ्या पडद्यावर; 'ही' अभिनेत्री साकारणार जशोदाबेन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. यानंतर मात्र, चर्चा सुरु झाली ती म्हणजे मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका कोण साकारणार? मात्र, हा शोध संपला असून जशोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता ही साकारणार आहे.
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. यानंतर मात्र, चर्चा सुरु झाली ती म्हणजे मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका कोण साकारणार? मात्र, हा शोध संपला असून जशोदाबेन यांची भूमिका अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता ही साकारणार आहे.
जशोदाबेन म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याची जोडीदार. मोदी यांच्या या चित्रपटातील जशोदाबेन ही भूमिका आव्हानात्मक असून त्या भूमिकेला विविध पैलू तसंच कंगोरे असल्याचे बरखाने सांगितले आहे. त्यासाठी मोदींच्या जीवनप्रवासावर आधारित कथांचं तिने वाचन सुरू केले आहे. या भूमिकेसाठी गुजराती लहेजा शिकावा लागणार असल्याचेही तिने म्हटले आहे.
दरम्यान, अहमदाबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. जसोदाबेन यांचं जीवन आणि त्याच्या व्यक्तीमत्त्वाबाबत फारच कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे ही आव्हानात्मक भूमिका यशस्वीरित्या साकारु असा विश्वास बरखाला आहे.