शाळेतून काढलं, वेटरचं काम केलं; वाचा Be YouNick चा यशस्वी प्रवास

'Be YouNick' या युट्यूब चॅनेलचा सर्वेसर्वा निकुंज लोटीया याने आपल्या जीवनातील अडचणी आणि संघर्ष 'Humans of Bombay' या माध्यामाला बोलताना शेअर केला आहे.
निकुंज लोटीया
निकुंज लोटीया Sakal

आजकाल सोशल मीडिया हे सर्वांच्या अगदी जवळचं साधन बनलं आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपापलं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी झटत असतो. सोशल मीडियावर आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण करणारे कंटेंट क्रिएटरसुद्धा आजकाल खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. अशाच 'Be YouNick' या युट्यूब चॅनेलचा सर्वेसर्वा निकुंज लोटीया याने आपल्या जीवनातील संघर्ष 'Humans of Bombay' या माध्यमाला बोलताना शेअर केला आहे. त्याने आपला संघर्ष सांगताना आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या टप्प्यातील संघर्षाबाबत सांगितलं आहे.

आम्ही ज्यावेळी मुंबईतील कुलाब्यातून डोंबिवलीला राहायला आले तेव्हा मी फक्त २ वर्षाचा होतो. माझ्या वडिलांचा बिझनेस अचानक मोडकळीस आला होता आणि आम्हाला त्यावेळी खूप अडचणींचा सामना करत जीवनाशी जुळवून घ्यावं लागलं होतं. त्यावेळी आमच्याकडे पैसे मिळवण्याचं काहीच साधन नव्हतं. आम्ही वाचवलेल्या पैशात कसंबसं राहत होतो आणि माझ्या शाळेत फीस भरायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. मला आठवतंय की मला त्यावेळी सगळ्या मुलांसमोर शाळेतून हाकललं होतं आणि त्यावेळी मला खूप लाज वाटली होती. मला शाळेत जाता यावं यासाठी माझ्या आईने थेपलास बनवायला सुरुवात केली होती आणि यासाठी माझ्या मोठ्या भावानेसुद्धा तीला मदत केली. मलाही कामासाठी मदत करायची खूप इच्छा होती पण मी त्यावेळी खूप लहान होतो.

निकुंज लोटीया
MPSC मध्ये यश मिळवून विद्यार्थ्यांनी इंदापूरचे नाव लौकिक केले : दत्तात्रय भरणे

दरम्यान १२ वी नंतर मी हॉटेल मॅनेजमेंट शिकण्यासाठी लोन काढलं आणि तिथेच बाजूला बार्टेंडिंग चालू केलं. दिवसाच्या ३५० रुपयांसाठी मी रात्रभर हॉटेलमध्ये काम करायचो आणि पहाटे घरी यायचो. पण येवढंच पुरेसं नव्हतं, मला माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायची इच्छा होती. मी गोव्यात एक वर्ष राहून रात्रंदिवस कामही केलं आहे. पण माझ्या घरच्यांनी मला घरी बोलावलं म्हणून मी घरी आलो आणि कॉल सेंटरवर काम करु लागलो. मला ते आवडत नव्हतं पण करण्याशिवाय पर्यायदेखील नव्हता. ते काम मी तीन वर्ष केलं कारण मला त्याठिकाणी चांगले पैसे मिळायचे. पण जेव्हा मला एका मित्राने युट्यूबबद्दल सांगितले आणि त्यापासून पैसे कसे कमवायचे हे सांगितलं तेव्हा मी खूप उत्साही झालो. शाळेत मी नेहमी विनोदी विद्यार्थी होतो मग मी त्याला पैसै कमवण्याचा मार्ग कसा बनवता येईल यासाठी प्रयत्न करु लागलो.

त्यानंतर मी एक 'Not so Funny' नावाचं युट्यूब चॅनेल सुरु केलं, पण चॅनेलच्या नावामुळे माझ्या व्हिडिओला जास्त लोकं पाहत नव्हते. तेव्हा लोक माझी चेष्टा उडवायला लागले. मी त्यावेळी नाराज झालो पण मला यातून आनंद मिळाला होता. जॉब करत असताना एके दिवशी मला माझा बोनस मिळाला आणि मी त्यावेळी कधीच लोकांसाठी काम न करण्याचा निर्णय घेतला.नंतर मी त्यादिवशी खूप दारु पिलो आणि मला त्यावेळी धैर्य मिळाले. मी 'Be YouNick' नावाचं युट्यूब चॅनेल चालू केलं. आणि मुलं स्त्रियांना पटवण्यासाठी स्वता:ला कसं मूर्ख बनवतात यावर मी एक व्हिडिओ बनवून अपलोड केला. त्या व्हिडिओला १५०० पेक्षा अधिक लोकांनी पाहिल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मी तेव्हापासून खूप प्रेरित झालो आणि पुढच्या वर्षी ४० व्हिडिओ बनवले. त्यानंतर लोक युट्यूबवर हळूहळू मला ओळखू लागले. काही वेळा पैशांसाठी मला बार्टेंडिंग गिगमध्ये काम करावं लागलं. तेथे काम करताना काही लोकांनी माझ्यासोबत सेल्फीही घेतल्या पण मी व्हिडिओ बनवणं सोडलं नाही. त्यावेळी माझ्या आईवडिलांनीसुद्धा मला खूप मदत केली. तुला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आणि त्यानंतर मी मागे वळून बघितलेच नाही.

सध्या मी माझ्या स्वप्नांसोबत राहत आहे. मी पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर आहे जो आपल्या स्वत:च्या तत्वांवर जीवन जगत आहे. पण माझ्या कुटुंबाला जे हवं आहे ते देण्यात मला आनंद वाटतो. मी माझ्या आजीसाठी काही दिवसांपूर्वी झुंबर खरेदी केले होते, ते पाहून माझ्या आईच्या आणि आजीच्या चेहऱ्यावरील आनंद हे माझ्यासाठी खूप मोठं समाधान होतं. मी माझ्या धडपडत्या स्वभावामुळं इथपर्यंत आलो हे मी प्रामाणिकपणाने सांगतो. तुम्हीही आयुष्यात धडपडत राहा, प्रयत्न करत राहा, लोकांना प्रयत्न करणारे आणि धडपडणारे लोकं आवडतात.

असं निकुंज लोटीयाने 'Humans of Bombay' ला बोलताना आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com