Kantara 2 Video: पंजुर्ली दैव पुन्हा येणार..! कांताराच्या शुटींगला सुरुवात करण्याआधी रिषभचा व्हिडीओ व्हायरल

रिषभचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आनंद झाला असुन कांतारा २ साठी चाहते उत्सुक आहेत.
Kantara 2 Video: पंजुर्ली दैव पुन्हा येणार..! कांताराच्या शुटींगला सुरुवात करण्याआधी रिषभचा व्हिडीओ व्हायरल

Kantara 2 Rishabh Shetty Bhuta Kola News: कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक, रिषभ शेट्टी, त्याच्या कांतारा चित्रपटाच्या यशाने 2022 मधील सर्वात मोठा स्टार म्हणून उदयास आला.

स्थानिक देवता, पंजुर्ली आणि भूता कोलाच्या उत्सवावर आधारित, चित्रपटाने केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान मिळवले.

आता, चित्रपटाच्या प्रीक्वलच्या शूटच्या आधी, रिषभने पुन्हा एकदा पंजुर्ली दैवाचा आशीर्वाद मागितला. रिषभने आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Before starting the shooting of Kantara 2, Rishabh shetty video went viral)

Kantara 2 Video: पंजुर्ली दैव पुन्हा येणार..! कांताराच्या शुटींगला सुरुवात करण्याआधी रिषभचा व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Shaheer: शाहीरांच्या पत्नी राधाबाईंना कसा वाटला महाराष्ट्र शाहीर? एका कृतीत सगळं आलं

रिषभ शेट्टीने भूता कोला फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. अभिनेता-दिग्दर्शकालाही पंजुर्ली दैवाकडून दैवी आशीर्वाद मिळाला.

रिषभचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. रिषभचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना आनंद झाला असुन कांतारा २ साठी चाहते उत्सुक आहेत.

 दरम्यान, बातमी आली आहे की ऋषभ शेट्टीने दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली आहे, जो सिक्वेल नसून प्रीक्वल असेल आणि जर सर्व काही ठीक झाले तर चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये सुरू होईल.

Kantara 2 Video: पंजुर्ली दैव पुन्हा येणार..! कांताराच्या शुटींगला सुरुवात करण्याआधी रिषभचा व्हिडीओ व्हायरल
Irfan Khan: अब्बा बेडवर झोपले होते, त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि... शेवटच्या क्षणी इरफानची अवस्था

वृत्तानुसार, होंबळे फिल्म्सचे संस्थापक विजय किरंगादुर यांनी सांगितले की, ग्रीमन, देवता आणि राजा यांच्यातील नाते 'कांतारा 2' मध्ये दाखवले जाईल. राजाने देवतेशी करार केला होता की तो गावकऱ्यांचे आणि त्यांच्या जमिनीचे रक्षण करेल पण नंतर परिस्थिती बदलली.

रिषभने असेही सांगितले की चित्रपटाच्या शूटिंगला पावसाळ्याची गरज असल्याने जूनमध्ये शूटिंग सुरू करण्याची योजना आखली आहे आणि पुढील वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल.

यावेळी रिषभ शेट्टी कर्नाटकातील किनारी भागातील जंगलात गेले असून तेथे ते लोककथा अधिक जाणून घेण्यासाठी दोन महिने रेकी करणार आहेत.

'कांतारा 2'चे बजेट वाढवण्यात आले आहे, पण चित्रपटाची स्टाईल, नरेशन आणि सिनेमॅटोग्राफी मागील चित्रपटाप्रमाणेच राहील, असेही विजयने सांगितले.

चित्रपटात आणखी कलाकार जोडले जात आहेत आणि ते देखील मोठे नाव असू शकतात. असंही सांगण्यात येतंय, सुपरस्टार रजनीकांत 'कांतारा 2' मध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com