
अभिनेता अक्षय कुमारचा Akshay Kumar 'बेलबॉटम' BellBottom हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय अक्षयने घेतला होता. लॉकडाउनच्या अटींमुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह बंद आहेत आणि इतर राज्यांमध्ये मर्यादित क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे याचा फटका चित्रपटाच्या कमाईला बसला आहे. 'बेलबॉटम'ने पहिल्या दिवशी जवळपास २.५ ते २.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याचं कळतंय. BellBottom Box Office Collection
'बॉक्स ऑफिस इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्ली ही चित्रपटाची सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे, कारण संपूर्ण देशभरातील कमाईत २० टक्के योगदान हे नवी दिल्लीतून आहे. मात्र तरीही चित्रपटाची अपेक्षित कमाई होऊ शकली नाही. प्रदर्शनाच्या दिवशी अक्षय कुमारचा चित्रपट जवळपास तीन कोटी रुपयांची कमाई करेल, अशी अपेक्षा होती.
करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा 'बेलबॉटम' हा पहिला मोठा चित्रपट आहे. देशभरातील एक हजारहून कमी चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित झाला. त्यातही मर्यादित क्षमतेची अट असल्याने कमाईवर मोठा परिणाम झाला. 'रुही' आणि 'मुंबई सागा' या दोन्ही चित्रपटांच्या कमाईपेक्षा कमी कमाई बेलबॉटमने केली. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेनंतर चित्रपटगृहांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी दिल्यानंतर रुही आणि मुंबई सागा प्रदर्शित झाले होते. रुहीने पहिल्याच दिवशी तीन कोटी रुपयांची कमाई केली होती तर मुंबई सागाने २.८२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.