तर 'मैने प्यार किया' मध्ये सलमानसोबत भाग्यश्री दिसलीच नसती..एका फोनकॉलनं बदललं तिचं नशीब..Bhagyashree & Salman Khan -Maine Pyar Kiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagyashree & Salman Khan -Maine Pyar Kiya

Bhagyashree: तर 'मैने प्यार किया' मध्ये सलमानसोबत भाग्यश्री दिसलीच नसती.. एका फोनकॉलनं बदललं तिचं नशीब..

Bhagyashree: भाग्यश्री बॉलीवूडची अशी एक अभिनेत्री आहे जी पहिल्या सिनेमापासूनच आपल्या चाहत्यांच्या मनात असं घर करुन गेलीय की शंभर एक सिनेमे केलेल्या अभिनेत्रीलाही ते जमले नसेल. भाग्यश्री राजघराण्यातून आहे..जिथे सिनेमात काम करण्याची परवानगी दिली जात नाही. तिचा जन्म २३ फेब्रुवारी,१९६९ साली सांगलीचे राजा विजयसिंग राव माधवन राव पटवर्धन यांच्या घरात झाला.

आज २३ फेब्रुवारी रोजी भाग्यश्री आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. भाग्यश्रीला बॉलीवूडचा पहिला सिनेमा मिळाला होता..ज्यात तिनं सध्याचा सुपरस्टार सलमान खानसोबत डेब्यू केला होता. आणि आपल्या पहिल्याच सिनेमात तिनं कमाल केली होती.

सलमान खानसोबत 'मैने प्यार किया' सिनेमा केल्यानंतर ती रातोरात सुपरस्टार झाली होती. अर्थात..तिला हा सिनेमा मिळण्याची कहाणी देखील इंट्रेस्टिंग आहे. जेव्हा सूरज बडजात्या हा सिनेमा बनवण्यास जात होते तेव्हा त्यांच्या डोक्यात वेगळ्याच हिरोईनचं नाव डोक्यात होतं.

सलमान खान चा सगळ्यात पहिला सुपरहिट सिनेमा होता 'मैने प्यार किया'..ज्याचं दिग्दर्शन बॉलीवूडच्या सर्वात सुपरहिट दिग्दर्शकांपैकी एकानं म्हणजे सूरज बडजात्या यांनी केलं होतं. या सिनेमात सलमान खाननं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकले होते तर भाग्यश्रीच्या चेहऱ्यावरची निरागसता लोकांना खूप पसंत आली होती.

दोघांची जोडी हिट राहिली होती आणि ज्याच्या त्याच्या तोंडावर फक्त या स्टार्सचेच नाव त्यावेळी होते. आजही बॉलीवूडच्या पडद्यावरील हिट जोडीमध्ये सलमान-भाग्यश्रीचं नाव पहिलं निघतं. पण खूप कमी जणांना हे माहित आहे की भाग्यश्री सूरज बडजात्याची पहिली पसंत नव्हती.

सूरज बडजात्या यांनी निलमला आपल्या सिनेमासाठी पसंत केलं होतं. आता निलमच्या हातातून ही फिल्म निघून जाणं आणि भाग्यश्रीच्या झोळीत पडणं हे कुठल्या मॅजिकपेक्षा कमी नव्हतं.

त्याचं झालं असं की सूरज बडजात्या आपल्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार होते आणि या सिनेमासाठी त्यांना सगळं बेस्ट हवं होतं. सुरुवातील तर म्हणे त्यांना सिनेमाची स्क्रीप्टच पसंत आली नव्हती. त्यांनी आपल्या हिशोबानं स्क्रीप्टमध्ये सर्व बदल केले..पुन्हा नव्यानं कथा लिहिली.

वडीलांनी समजावलं म्हणून ते रोमॅंटिक सिनेमा बनवायला तयार झाले. त्यानंतर सूरज बडजात्या यांनी सलमान खानला सिनेमाचा हिरो म्हणून पसंत केलं आणि मग शोध सुरु झाला निलमचा .ते स्वतः अॅक्टिंग स्कूलमध्ये जायचे का तर चांगली अभिनेत्री आपल्याला भेटेल.

शेवटी सूरजने निश्चित केलं की सुमनच्या रोलसाठी निलमला कास्ट करायचं. पण तेव्हा निलन सनी देओलसोबत चेन्नईत शूट करत होती. म्हणून तिला भेटायला त्यांनी विमानाचं तिकीटही काढलं. पण विमानात बसणार इतक्यात त्यांना वडीलांचा फोन आला. आणि त्यांनी थांबायला सांगितलं. आणि त्यांच्या वडीलांच्या त्या फोनने सगळं गणितच बदललं.

सूरज बडजात्याच्या वडीलांनी त्यांना एका मॅगझीनवरचा फोटो दाखवत म्हटलं ,'ही मुलगी कशी आहे?'. तेव्हा भाग्यश्री पहिल्या नजरेत सूरज बडजात्यांना आवडली. त्यानंतर तिचं ऑडिशन घेतलं गेलं. आणि मग अशा पद्धतीनं निलमचा पत्ता 'मैने प्यार किया' मधून कट झाला आणि भाग्यश्रीचं नशीबद बदललं. अखेर भाग्यश्री 'मैने प्यार किया' ची हिरोईन बनली.