भाग्यश्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 एप्रिल 2017

बॉलिवूडमधील स्टार किड्‌सच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो फॅण्टम फिल्म्सचा आगामी चित्रपट "मर्द को दर्द नहीं होता' मध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. यात अभिमन्यूसोबत आणखी एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे अभिनेत्री राधिका मदानचा. हे दोघे एक वर्षांपासून अभिनयाचे धडे गिरवत आहेत. या चित्रपटात आतापर्यंत न पाहिलेले ऍक्‍शन सीन पाहायला मिळतील. याबाबत निर्माता अनुराग कश्‍यप म्हणाले, "वासनने मार्शल आर्टसवर हा चित्रपट लिहिला आहे.

बॉलिवूडमधील स्टार किड्‌सच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो फॅण्टम फिल्म्सचा आगामी चित्रपट "मर्द को दर्द नहीं होता' मध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. यात अभिमन्यूसोबत आणखी एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे अभिनेत्री राधिका मदानचा. हे दोघे एक वर्षांपासून अभिनयाचे धडे गिरवत आहेत. या चित्रपटात आतापर्यंत न पाहिलेले ऍक्‍शन सीन पाहायला मिळतील. याबाबत निर्माता अनुराग कश्‍यप म्हणाले, "वासनने मार्शल आर्टसवर हा चित्रपट लिहिला आहे. अशा प्रकारची कथा मी कधी वाचली नव्हती आणि कधी पाहिली नव्हती. अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती करायला मिळत असल्याने मी खूश आहे.'  
 

Web Title: Bhagyashree's Son Abhimanyu Dassani Signs His Bollywood Debut 'Mard Ko Dard Nahin Hota'