शनायाने भाऊबीज साजरी केली चक्क सौमित्रसोबत!

टीम ईसकाळ
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

एका बहिण-भावाच्या जोडीने सेटवरच भाऊबीज साजरी केली आहे. हा सेट होता 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचा... आणि भाऊ-बहिण कोण होते ओळखा? भाऊ होता राधिका सुभेदारचा होणारा नवरा सौमित्र आणि बहिण होती चक्क गुरूनाथ सुभेदारची गर्लफ्रेंड शनाया!

दिवाळीमधले सगळेच दिवस तसे खास असतात, पण सर्व भाऊ-बहिणींसाठी लाडका दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी सोशल मीडियावर असंख्य भावा-बहिणींचे फोटो मस्त मस्त कॅप्शन्स देऊन शेअर झालेले असतात. या सगळ्यात कलाकारही कुठे कमी पडत नाहीत बरं का... कामाचा कितीही ताण आणि व्यग्र वेळांमधूनही खास वेळ काढत आपल्या सेटवरच सण साजरे करतात.

अशाच प्रकारे एका बहिण-भावाच्या जोडीने सेटवरच भाऊबीज साजरी केली आहे. हा सेट होता 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचा... आणि भाऊ-बहिण कोण होते ओळखा? भाऊ होता राधिका सुभेदारचा होणारा नवरा सौमित्र आणि बहिण होती चक्क गुरूनाथ सुभेदारची गर्लफ्रेंड शनाया! अर्थात ही ऑफस्क्रीन भाऊबीज असल्यामुळे 'माझ्या नवऱ्याची बायको'चा दिग्दर्शक अद्वैत दादरकर आणि ईशा केसकर या दोघांनी सेटवर भाऊबीज साजरी केलीय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Naye rishtey ban rahe hai #actor_bhai_behen #onset #makeuproomdiaries @zeemarathiofficial #bhaidooj #bhaubeej #भाऊबीज

A post shared by Poori poori filmy (@sharmila_rajaram_shinde) on

सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका चर्चेत आहे. टीआरपीच्या यादीमध्ये नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असते. या मालिकेतील शनाया, गुरुनाथ सुभेदार आणि राधिका सुभेदार या तीन पात्रांची केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhaiddoj video of Adwait Dadarkar and Isha Keskar gets viral