सल्लूच्या ‘भारत’चे संमिश्र स्वागत

सकाळ न्यूज नेटवर्क 
Thursday, 6 June 2019

दरवर्षी रमजान ईद भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी ठरते. यंदाही सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ या चित्रपटाचे स्पेशल गिफ्ट घेऊन आला होता. सलमान, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले. सकाळी आणि दुपारी या चित्रपटाचे काही शोज्‌ हाउसफुल्ल होते. सिंगल स्क्रीन तसेच मल्टिप्लेक्‍समध्ये या चित्रपटाला देशभर संमिश्र प्रतिसाद मिळाला.

मुंबई - दरवर्षी रमजान ईद भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी फिल्मी मेजवानी ठरते. यंदाही सलमान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ या चित्रपटाचे स्पेशल गिफ्ट घेऊन आला होता. सलमान, कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी स्वागत केले. सकाळी आणि दुपारी या चित्रपटाचे काही शोज्‌ हाउसफुल्ल होते. सिंगल स्क्रीन तसेच मल्टिप्लेक्‍समध्ये या चित्रपटाला देशभर संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

या चित्रपटाचे शंभर कोटी रुपयांचे बजेट आहे. ‘भारत’ हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. आज काही ठिकाणांवर तिकिटाचे दर वाढविण्यात आले होते, तरीही चाहत्यांनी ही तिकिटे खरेदी केली.

या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यामुळे या चित्रपटावर सायंकाळी थोडाफार परिणाम झाला. परंतु हा चित्रपट दोन दिवसांत चांगली पकड धरेल.
- दीपक कुडले, अध्यक्ष, सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्‍झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Movie Salman Khan Entertainment Bollywood