Bharat : सलमानचा लूक पाहून सगळेच अवाक; 'भारत'चा पोस्टर रिलीज

सोमवार, 15 एप्रिल 2019

सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी प्रदर्शित होईल. 

मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी प्रदर्शित होईल. 

या पोस्टरवर '2010' असे ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे, तर 'देशाचा आणि एका व्यक्तीचा एकत्र प्रवास' अशी 'भारत'ची टॅगलाईन आहे. सलमानने हे पोस्टर ट्विट केले आहे, त्यासोबत 'जितने सफेद बाल मेरे सिर और दाढी मै है, उससे कई ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है' असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टरमुळे, सलमानच्या लुकमुळे आणि त्याने पोस्टरला दिलेल्या कॅप्शनमुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

या पोस्टरमध्ये सलमानसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व जॅकी श्रॉफसुद्धा पाहायला मिळत आहेत. सलमान खानने अशी वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका यापूर्वी कधीच केली नाही, त्यामुळे सलमानचा असा लूक बघून सगळेच अवाक झाले आहेत. नक्कीच आता सर्वांचे लक्ष 5 जूनकडे लागले आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat s poster launch and tweeted by Salman Khan