'द कपिल शर्मा शो' मध्ये पुन्हा होणार भारती सिंहची एंट्री? वाचा काय म्हणाली भारती..

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 15 December 2020

भारती सिंह पुन्हा एकदा प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये परतली आहे. या शोसाठी भारतीने तिच्या शूटींगला देखील सुरुवात केली असून याबाबतची माहिती तिने स्वतः सोशल मिडियावरुन दिली आहे.

मुंबई- प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंहचे चाहते आणि मित्रमंडळी तिच्यासोबत आहेत म्हणूनंच तिचं नशीब देखील तिला साथ देत आहे. याच कारणामुळे भारती सिंह पुन्हा एकदा प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये परतली आहे. या शोसाठी भारतीने तिच्या शूटींगला देखील सुरुवात केली असून याबाबतची माहिती तिने स्वतः सोशल मिडियावरुन दिली आहे. भारतीने तिचे सेटवरचे काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. 

हे ही वाचा: पुनीत पाठकचा पत्नी निधीसोबत शाहरुख खानच्या गाण्यावर रोमँटिक डान्स, व्हिडिओ व्हायरल

भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढली झाली जेव्हा त्यांना नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने त्यांच्या घरावर छापेमारी केली. सध्या सिने इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सची प्रकरणं खूपंच गाजत आहेत आणि याच प्रकरणात हर्ष आणि भारती देखील अडकले. एनीसीबीने दोघांची चौकशी केल्यावर दोघांनी भांग घेतल्याचं कबुल केलं. ही घटना २१ नोव्हेंबरची आहे. भारती आणि हर्ष यांना जेलमध्ये देखील पाठवलं गेलं मात्र २२ नोव्हेंबरला दोघांना जामीन मिळाला. 

ड्रग्स प्रकरणात दोघांचं नाव आल्यानंतर अशी चर्चा सुरु झाली की आता भारती 'द कपिल शर्मा शो'चा भाग नसेल. चॅनल त्यांची प्रतिमा मलिन न होऊ देण्यासाठी भारतीला शोमधून बाहेर काढण्याचा विचार करत होतं. भारतीचा मित्र आणि शोचा होस्ट कपिल शर्मा चॅनलच्या या निर्णयाविरोधात होते. यामध्ये त्याचा सोबत दिली ती त्याचा सहकलाकारा कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांनी.

मात्र सगळ्या गोष्टी निराधार ठरल्या कारण भारतीने पुन्हा एकदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये एंट्री घेतली. भारतीने सेटवरचे फोटो शेअर करत ती या शोचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. गेल्या शनिवारीच भारतीने शोसाठी शूटींग सुरु केलं होतं.   

bharti singh returns to the kapil sharma show after arrest in drugs case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharti singh returns to the kapil sharma show after arrest in drugs case