'पांडू'ची बॉक्स ऑफिसवर जादू; वीकेंडला जमवला कोटींचा गल्ला

चित्रपटात भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका
Pandu Movie
Pandu Movie
Updated on

लॉकडाऊननंतर सिनेमागृहे खुली झाल्यानंतर मराठी चित्रपटांचं भवितव्य काय असेल, मोठ्या बॅनर्सच्या हिंदी चित्रपटांपुढे यांचा टिकाव लागेल का हिंदीमुळे मराठीला हव्या तशा स्क्रिन्स आणि शोज मिळतील का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण या सर्वच प्रश्नांना अतिशय सकारात्मक आणि सणसणीत उत्तर दिलं आहे 'पांडू' Pandu या चित्रपटाने. ‘पांडू’ने पहिल्या तीन दिवसांत १.९१ कोटी रुपयांची कमाई केली. याशिवाय अनेक मल्टिप्लेक्समध्ये चालू असलेल्या हिंदी सिनेमांचे प्राईम टाइमचे शोज कमी करून ते शोज पांडूला देण्यात आले आहेत. यामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये एक आश्वासक चित्र निर्माण झालं असून अनेक निर्मात्यांचा आपला मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतचा आत्मविश्वास दुणावला आहे. (Pandu Box Office Collection)

गेली दीड वर्षे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मात्र सगळीच परिस्थिती बदलली. चित्रपट प्रदर्शनासाठी अनेक नियम आणि निर्बंध आले. या सगळ्याचा सामना मराठी चित्रपट कसा करेल असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. याच वातावरणात झी स्टुडिओजने आपला ‘पांडू’ हा सिनेमा प्रदर्शित केला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपासून गावागावांतही अनेक ठिकाणी पांडूने हाउसफुल्लचे बोर्ड झळकवले.

Pandu Movie
'दोन सेकंद धस्सं झालं काळजात..'; विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत

'पांडू' या चित्रपटात भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी यांच्या भूमिका आहेत. मुख्य कलाकारांचं दमदार अभिनय, प्रविण तरडे, आनंद इंगळेंसारखे कसलेले सहकलाकार, थिरकायला लावणारं संगीत आणि विजू माने यांचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन यामुळे चित्रपटाला यश मिळालं आहे.समीक्षकांनीही पांडूचं कौतुक केलं आणि प्रेक्षकांनीही आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com