Bhaurao Karhade: 'TDM' नंतर गावकडच्या रील स्टार्सना घेऊन भाऊराव कऱ्हाडेंचा नवा चित्रपट?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची भाऊरावांकडे चित्रपटाची मागणी..
Bhaurao Karhade announce upcoming marathi movie with instagram reel star influencers after TDM
Bhaurao Karhade announce upcoming marathi movie with instagram reel star influencers after TDMsakal

Director Bhaurao Karhade: सध्या सर्वत्र TDM टीडीएम चित्रपटाची हवा असलेली पाहायला मिळतेय. हा रोमँटिक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट आणि या चित्रपटातील गाण्यांची क्रेझ प्रेक्षक वर्गामध्ये पाहायला मिळतेय.

'ख्वाडा', 'बबन' फेम भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम या चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. नवीन चेहरे हेरणार्या भाऊरावांनी आजवर नवीन चेहरा आणि नवीन कथानक घेऊनच चित्रपटाची निर्मिती केली.

नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर 'सिटी प्राईड मल्टिप्लेक्स' येथे कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान सिनेमाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी या प्रीमियर शोला उपस्थिती लावून चारचाँद लावले होते.

यावेळी 'टीडीएम'च्या प्रीमियरची कुणकुण लागताच सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सनी 'सिटी प्राईड मल्टिप्लेक्स कडे घाव घेतली. त्यामुळे भाऊसाहेब आता रील स्टार्स ला घेऊन चित्रपट करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

(Bhaurao Karhade announce upcoming marathi movie with instagram reel star influencers after TDM nsa95)

Bhaurao Karhade announce upcoming marathi movie with instagram reel star influencers after TDM
Maharashtra Din: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात फक्त एका 'च' वरुन आचार्य अत्रे यशवंतराव चव्हाणांवर तुटून पडले होते..

या प्रीमियर सोहळ्यावेळी अचानक एवढ्या संख्येनें आलेल्या इन्फ्लुएन्सर्स पाहून सर्वांची तारांबळ उडाली . सर्व इन्फ्लुएन्सर्सनी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंना भेटण्याचा तगादा लावला. कोणते ही आढेवेढे न घेता भाऊराव कऱ्हाडें या इन्फ्लुएन्सर्स ना भेटले सर्वां बरोबर सेल्फी काढले.

एवढंच काय तर चक्क काहींनी भाऊराव कऱ्हाडें बरोबर रिल करण्याच्या आग्रह केला तो देखील त्यांनी पूर्ण केला आणि तसेच रील्स स्टार्स च्या कामाचे कौतुक देखील केले .

चाहतावर्ग हा कलाकार, दिग्दर्शक यांना भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. भाऊराव कऱ्हाडे नेहमीच नवीन चेहऱ्यांना सिद्ध करण्याची संधी देतात आणि अशीच संधी त्यांनी रील स्टार्स यांना देखील द्यावी अशी अपेक्षा सर्व इन्फ्लुएन्सर्सने व्यक्त केली.

मातीशी नाळ जोडली असणाऱ्या या दिग्दर्शकाचा इथवरचा प्रवास खडतर होता हे आपण सारेच जाणतोय. राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्राप्त भाऊराव कऱ्हाडे यांच्याकडे रील स्टार्सने केलेली मागणी पाहता ही त्यांच्या कामाची पोचपावतीच आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे आता भाऊसाहेब पुढचा चित्रपट या रील स्टार्स घेऊन करणार का अशी चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com