'त्या' तिघी करणार भविष्याची एेशीतैशी

टीम ई सकाळ
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

: रोज सकाळी पेपर वाचताना सहज आपले लक्ष्य, आजचा दिवस कसा जाईल, आजचे भविष्य.. ह्या सदरांकडे जातेच. भविष्याबद्दल कुतूहल सगळ्यांनाच असते. विश्वास असो वा नसो पण सगळेच ह्या सदरावर नजर फिरवितात. प्रिया, मेघा, निशी तीन मैत्रिणी. मेघाचा ज्योतिषावर ठाम विश्वास. प्रियाला मात्र सर्व भोंदूगीरीचे, फसवणुकीचे प्रकार वाटतात. निशी मात्र गोंधळलेली, तिला कधी मेघाचे विचार पटतात तर कधी प्रियाचे.अश्यात त्यांच्या जीवनात करमरकर नावाच्या ज्योतिषीने केलेल्या भविष्यवाणीने वादळ उठते. त्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवायला मन तयार नसते, पण दुर्लक्ष करणे शक्य नसते.. कारण खरच ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे घडले तर...
 

मुंबई : रोज सकाळी पेपर वाचताना सहज आपले लक्ष्य, आजचा दिवस कसा जाईल, आजचे भविष्य.. ह्या सदरांकडे जातेच. भविष्याबद्दल कुतूहल सगळ्यांनाच असते. विश्वास असो वा नसो पण सगळेच ह्या सदरावर नजर फिरवितात. प्रिया, मेघा, निशी तीन मैत्रिणी. मेघाचा ज्योतिषावर ठाम विश्वास. प्रियाला मात्र सर्व भोंदूगीरीचे, फसवणुकीचे प्रकार वाटतात. निशी मात्र गोंधळलेली, तिला कधी मेघाचे विचार पटतात तर कधी प्रियाचे.अश्यात त्यांच्या जीवनात करमरकर नावाच्या ज्योतिषीने केलेल्या भविष्यवाणीने वादळ उठते. त्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवायला मन तयार नसते, पण दुर्लक्ष करणे शक्य नसते.. कारण खरच ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे घडले तर...

भारतातील पहिला ज्योतिष विषयक रोमांचक चित्रपट “भविष्याची ऐशी तैशी.. द प्रेडिक्शन” दिनांक ६ ऑक्टोबर, रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ह्या चित्रपटाचे नुकतेच म्युझिक लौंच दादर येथे संपन्न झाले, “भविष्याची ऐशी तैशी.. द  डिक्शन” या चित्रपटात एकूण ४ गाणी असून, सौ चंद्रा रमेश तलवारे यांच्या गीतांना संगीतकार सलील अमृते ने आजच्या  ढीला आवडतील अशीच मधुर केली आहेत. सौ. चंद्रा रमेश तलवारे लिखित व सुरेंद्र वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात वर्षा  सगावकर, संदीप कोचर, आसावरी जोशी, जु. स्वप्नील जोशी, पंकज विष्णू, आनंदा कारेकर, किशोर नांदलस्कर, प्रवीण  लवारे यांनी भूमिका केल्या असून रुचिता जाधव, मानसी नाईक, करोल झिने यांच्या धम्माल मैत्रीच्या केमिस्ट्रीने चित्रपटात रंग भरला आहे. रमेश तलवारे निर्मित या चित्रपटाने बऱ्याच दिवसा नंतर एक वेगळा रोमांचक चित्रपट बघितल्याचे समाधान मिळणार आहे.

 

Web Title: bhavishyachi aishi tashi releasing soon esakal news