Aanchal Tiwari Death Fact Check : पंचायतच्या नव्हे तर भोजपूरी सिनेविश्वातील आंचलचा अपघातात मृत्यू

भोजपूरी अभिनेत्री आंचल तिवारीच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Aanchal Tiwari Death news
Aanchal Tiwari Death newsesakal

Aanchal Tiwari Death Fact Check : बिहार राज्यातील कैमूर जिल्ह्यात झालेल्या त्या भीषण अपघाताची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामध्ये आंचल तिवारी नावाच्या अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक, एसयुव्ही आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात भोजपूरी गायक छोटू पांडे नावाच्या गायकाचाही मृत्यू झाला आहे.

सोशल मीडियावर या अपघातात पंचायत फेम अभिनेत्री आंचल तिवारीचं निधन झाल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. या सगळ्यात आता मोठी बातमी समोर आली असून त्यात पंचायत फेम आंचलचे नव्हे तर भोजपूरी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन घटनेची तातडीनं दखल घेतली गेली आहे.

नितेश कुमार यांनी आपल्या एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कैमुल जिल्ह्यातील मोहनिया ठाण्याच्या परिक्षेत्रात देवकलीच्या जवळ झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्या भीषण अपघातात एकुण ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात भोजपूरी मनोरंजन विश्वातील नवोदित कलाकारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. आज तकनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या भीषण अपघातामध्ये भोजपूरी अभिनेत्री आंचल तिवारी आणि सिमरन श्रीवास्तव यांचे देखील निधन झाले आहे.

Aanchal Tiwari Death news
Akshay Kumar: 'अरे बाबा तो टॉम क्रुझ आहे, त्याच्या एका स्टंटमध्ये आपल्या...' काय बोलून गेला अक्षय कुमार?

मोहनिया ठाण्याच्या परिक्षेत्रात रविवारी देवकली गावाच्या जवळ असणाऱ्या जीटी रस्यावर हा अपघात झाला. मोहनियाचे डीसीपी दिलीप कुमार यांनी सांगितलं की, मृतकांची ओळख सोमवारी पार पडली. त्यात भोजपूरी गायक विमलेश पांडे उर्फ छोटू पांडेचा समावेश आहे. अन्य मृत झालेल्या व्यक्तींमध्ये आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम,दधिबल सिंह, अनु पांडे, शशि पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे यांची नावं आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com