Akanksha Dubey Death : अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी 'या' गायकाला गाझियाबादमधून अटक

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह 26 मार्च रोजी सारनाथमधील एका हॉटेलमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
Akanksha Dubey Death Case
Akanksha Dubey Death Caseesakal
Summary

गाझियाबादचे पोलीस डीसीपी निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, समर सिंहला चार्म्स क्रिस्टल सोसायटी राजनगर येथून ताब्यात घेतलं.

गाझियाबाद : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यू प्रकरणातील (Akanksha Dubey Death Case) मुख्य आरोपी आणि गायक समर सिंह (Singer Samar Singh) याला यूपी पोलिसांनी (UP Police) अटक केलीये.

पोलिसांनी काल रात्री गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन (Nandgram Police Station) परिसरातून समर सिंहला ताब्यात घेतलं. गाझियाबादचे पोलीस डीसीपी निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, समर सिंहला चार्म्स क्रिस्टल सोसायटी राजनगर येथून ताब्यात घेतलं.

समर सिंहला अटक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीमचा भाग असलेले आशापूर चौकीचे प्रभारी अखिलेश वर्मा यांनी सांगितलं की, 'पोलीस स्टेशन नंदग्राम क्षेत्रांतर्गत येतं. समर सिंहला प्रथम गाझियाबाद न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर वाराणसी पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल.' सध्या समर सिंहला गाझियाबादच्या नंदग्राम पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलंय.

Akanksha Dubey Death Case
Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीत 'हा' बडा सुपरस्टार बदलणार भाजपचं 'नशीब'?
Akanksha Dubey Death Case
Akanksha Dubey Death Case

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा मृतदेह 26 मार्च रोजी सारनाथमधील एका हॉटेलमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी मृत अभिनेत्रीची आई मधू यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आझमगडचा रहिवासी समर सिंह आणि संजय सिंह यांच्याविरुद्ध कलम 306 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दोन्ही आरोपी सुरुवातीपासून फरार होते, त्यापैकी समर आता पकडला गेलाय.

Akanksha Dubey Death Case
Karnataka Politics : CM पदाचे दावेदार असणाऱ्या सिद्धरामय्यांना काँग्रेस देणार मोठा धक्का? 'या' जागेचं कापणार तिकीट!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com