
भुजः द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमात विजय कर्णिक नावाच्या हवाई दल अधिकाऱ्याची भूमिका अजय देवगण करत आहे.
मुंबई : अजय देवगणच्या 'भूज' चित्रपटाचा फर्स्ट लुक रीलिज झाला आहे. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगनने हवाई दलातले स्कॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका केली आहे. तसेच हा चित्रपट पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 14 ऑगस्टला रीलिज होणार आहे.
उमेश-प्रिया पुन्हा येताहेत, 'आणि काय हवं?'
दरम्यान, अजय देवगण, संजय दत्त, राणा डग्गुबत्ती आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या भूज चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भुजः द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमात विजय कर्णिक नावाच्या हवाई दल अधिकाऱ्याची भूमिका अजय देवगण करत आहे. याच स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांनी 1971 च्या युद्धात भारतासाठी मोठी कामगिरी बजावली होती.
It’s a privilege to present @ajaydevgn sir’s first look as Sq. Ld. Vijay Karnik from my upcoming directorial film #BhujThePrideOfIndia . #14Aug2020. pic.twitter.com/5pZiORdXjs
— Abhishekdudhaiya (@AbhishekDudhai6) January 1, 2020
1971 मध्ये भूजमध्ये पाकिस्तानने घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात अंदाधुंद गोळीबार केला होता. तिथली एअरस्पेस पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. असं झालं असतं तर भारताकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यताच संपुष्टात आली असती. पण ही उद्ध्वस्त झालेली धावपट्टी विजय कर्णिक यांनी भूजच्या आसपास राहणाऱ्या 300 महिलांच्या मदतीने एका रात्रीत पुन्हा उभी केली. भारतीय हवाई दलाची विमानं या धावपट्टीवर सुरक्षित उतरली. विजय कर्णिक यांच्या कामगिरीमुळे पाकिस्ताविरोधातल्या युद्धात भारताची सरशी होऊ शकली.