बच्चन कुटूंबियांची सुनबाई अडचणीत: काय आहे पनामा कनेक्शन?

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (bollywood big b amitabh bachchan) यांच्यावर आता मोठं संकट आलं आहे.
बच्चन कुटूंबियांची सुनबाई अडचणीत: काय आहे पनामा कनेक्शन?

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (bollywood big b amitabh bachchan) यांच्यावर आता मोठं संकट आलं आहे. ते म्हणजे त्यांची सुनबाई ऐश्वर्या रॉय (aishwarya rai) हिला पनामा प्रकरणात (pannama case) चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकऱण चर्चेत आले आहे. यापूर्वी अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यानं काही कागदपत्र ईडीला दिली होती. महानायक अमिताभ बच्चन यांचेही नाव या पनामा प्रकरणात आले होते. त्यांची काही परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून त्या कंपन्यांच्या संचालक बोर्डावर ते आहेत. त्यातील काही कंपन्यामध्ये ऐश्वर्याचेही नाव आले आहे. म्हणून बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. काही वेळापूर्वी ऐश्वर्या ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी पोहचल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बच्चन कुटूंबीय आणि पनामा कनेक्शन (bachchan and pannama reletion) नेमकं काय आहे हे आपण यानिमित्तानं जाणून घेणार आहोत. त्याचं झालं असं की, 2016 मध्ये पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदा कंपनीची कागदपत्रं समोर आली होती. यामध्ये जगातील मोठे नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावं उघड झाली. भारतातील जवळपास 500 जणांची नावं त्या यादीमध्ये होती. यामध्ये बच्चन कुटुंबाचाही समावेश आहे. कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे 1993 ते 1997 या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. पनामा देशातील मोझॅक फॉन्सेका नावाच्या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची 11.5 दशलक्ष गोपनीय कागदपत्रं उघड करण्यात आली होती. त्यातून राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, कलावंत, क्रीडापटू अशा अनेक बड्या व्यक्तींनी आपली मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, व्हर्जिन आयलँड, जर्सी, बहामा अशा प्रदेशांमध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर पैसा कशा पद्धतीने फिरवला गेला याबाबत थक्क करणाऱ्या बाबी स्पष्ट झाल्या होत्या.

बच्चन कुटूंबियांची सुनबाई अडचणीत: काय आहे पनामा कनेक्शन?
ऐश्वर्या,बिग बींवर करचुकवेगिरीचा आरोप,पनामा पेपर लीक प्रकरणी दिल्लीत चौकशी
बच्चन कुटूंबियांची सुनबाई अडचणीत: काय आहे पनामा कनेक्शन?
ऐश्वर्या राय बच्चन ED कार्यालयात, कागदपत्रांची तपासणी सुरू

चार कंपन्यांपैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलँडमध्ये होती. ऐश्वर्याला एका कंपनीची संचालिका बनवण्यात आलं होतं. नंतर तिला कंपनीची शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आलं. कंपनीचं नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होतं. त्याचं मुख्यालय व्हर्जिन आयलँडवर होतं. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील कंपनीत भागीदार होते. यासगळ्यात अमिताभ यांनी आरोप फेटाळले होते. त्यांनी सांगितलं, माझा अशा कोणत्याही कंपन्यांशी संबंध नसून मी या कंपन्यांचा संचालक नाही. मी परदेशात खर्च केलेल्या पैशांवरील सर्व कर भरलेला आहे. याशिवाय मी परदेशात पाठविलेले पैसे भारतीय कायद्याला धरून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बच्चन कुटूंबियांची सुनबाई अडचणीत: काय आहे पनामा कनेक्शन?
बलात्कारावर काँग्रेस आमदाराचं भयानक वक्तव्य: जया बच्चन भडकल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com