Big B Amitabh Bachchan
Big B Amitabh BachchanTeam esakal

मी आतापर्यत किती 'चॅरिटी' केली? सांगतो, बिग बी संतापले

अनेक नागरिकांनी सेलिब्रेटींकडे मदतीची याचना केली आहे.

मुंबई - बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan ) यांना आता ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या कोरोनाची गंभीर साथ आहे. त्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी अनेक नागरिकांनी सेलिब्रेटींकडे मदतीची याचना केली आहे. त्यावरुन त्यांनी सेलिब्रेटींना ट्रोलही केले आहे. ज्यांनी मदत केली नाही त्यांच्याविरोधात अपप्रचार सोशल मीडियावर सुरु आहे. त्यावरुन बिग बी (Big B Amitabh Bachchan ) भडकले आहेत. त्यांनी त्याविषयी आपली बाजु मांडली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमिताभ यांना ट्रोलिंग काही नवं नाही. यापूर्वीही त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी नेटक-यांच्या टीकेला (trolls gives details his charity work during coronavirus) तोंड द्यावं लागलं आहे. आता त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये एक मोठी पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी आतापर्यत आपण किती चॅरिटी केलीय याची माहिती दिलीयं. सध्या देश कोरोनाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस देशाची अवस्था बिकट होत चालली आहे. या महामारीच्या दरम्यान अनेक सेलिब्रेटींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. काही सेलिब्रेटी असे आहेत की ज्यांच्या चॅरिटीची माहिती लोकांपर्यत पोहचत नाही. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं.

amitabh blog
amitabh blog Team esakal
amitabh blog
amitabh blogTeam esakal

अमिताभ यांनी लिहिलं आहे की, मी मोठ्या प्रमाणात दानधर्म करतो. मात्र त्याविषयी मला बोलायला आवडत नाही. ते थोडसं ओशाळवाणे वाटते. सार्वजनिक ठिकाणी या गोष्टींचा खुलासा होणं मला आवडत नाही. मात्र ज्यावेळी त्या गोष्टीवरुन माझ्यावर टीका होते तेव्हा मला त्याविषयी बोलावं लागतं. अशाप्रकारे नेहमी माझ्यावर दबाव राहिला आहे. (trolls gives details his charity work during coronavirus) माझ्या परिवारासाठी या गोष्टी तितक्याशा महत्वाच्या नाहीत. आम्ही पहिल्यापासून या सर्व गोष्टी पाहत आलो आहोत

Big B Amitabh Bachchan
'तारक मेहताच्या बबिताला अटक करा, जातीवाचक शब्द वापरले'
Big B Amitabh Bachchan
‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत चित्तथरारक पर्व- पन्हाळ्यावरून सुटका

बिग बी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, माझ्याकडून पंधराशे शेतक-यांना त्यांचे कर्ज चुकवण्यासाठी मदत केली होती. जेणेकरुन त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडू नये. यात आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील शेतक-यांचा समावेश होता. यावेळी त्या सर्व शेतक-यांना कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com