esakal | फॅमिली' लघुपटासाठी दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाकार एकत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Big B and Rajinikanth short film Family is about importance of self isolation

फॅमिली' लघुपटासाठी दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाकार एकत्र

फॅमिली' लघुपटासाठी दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाकार एकत्र

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादूर्भावाने संपूर्ण देश लॉक़डाऊन असताना सर्व कलाकार आपापल्या घरी थांबले आहेत. सरकार कोरोनाचा सामना करत असताना बॉलिवूड कलाकारही कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढे आले आहेत. कलाकार घरीच थांबून सरकारला मदत करत आहेत. याशिवाय गरजूंना आर्थिक मदत करण्याबरोबरच जनतेला घरीच थांबण्याचे आवाहन करत आहेत. यातच आता कलाकार एक लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. 'फॅमेली' असे या लघुपटाचे नाव आहे. हा लघुपट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकताच हा लघुपट प्रदर्शित झाला असून अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मिडियावर हा लघुपट शेअर केला आहे. या लघुपटाद्वारे प्रेक्षकांना घरीच थांबून स्वतःची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला आहे. या फिल्मचं वैशिष्ट म्हणजे यात दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत अनेक सेलिब्रिटी झळकले आहेत. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, रणवीर कपूर, अभिनेता-गायक दिलजीत दोसांज, तमिळ अभिनेते रजणीकांत, बंगाली अभिनेते प्रोसेनजीत चॅटर्जी, मल्याळम अभिनेते मोहनलाल आणि ममूटी, कन्नड अभिनेते शिवा राजकुमार, अभिनेत्री आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हे सर्व कलाकार या लघुपटात आहेत. विशेष म्हणजे हा लघुपट सर्व कलाकारांनी स्वतःच्या घरी राहून सोशल डिसस्टसिंग पाळत तयार केला आहे.

या लघुपटाच्या सुरवातीला बिग बी त्यांचा काळा चष्मा शोधत असतात. त्यानंतर दिलजित दोसांज त्यांचा काळा चष्मा शोधायला सुरवात करतो. असं एक एक करून सगळे कलाकार त्यांचा चष्मा शोधायला सुरवात करतात. शेवटी त्यांचा चष्मा आलिया भट्टकडे मिळतो. प्रियांका चोप्रा बिग बींना चष्मा नेऊन देते. लघुपटात बिग बींनी आणि सर्व कलाकारांनी जनतेला लॉकडाऊनचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच आरोग्याची कशी काळजी घ्यावी, तसंच घरी राहणं किती गरजेचे आहे हेही सांगितले आहे. याशिवाय या लघुपटातून होणाऱ्या कमाईतून गरजूंना शिधा पुरवण्यात येणार असल्याचेही लघुपटाच्या शेवटी बिग बींनी सांगितले आहे.

loading image