ख-याखु-या जेम्स बाँडचे जाणेही ''007'' यादिवशीच; बिग बीं नी मांडलं गणित 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 1 November 2020

कॉनेरी यांनी द क्रुसेड, इंडियाना जोन्स. द हंट फॉर रेड ऑक्टोबर चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. दोन दशके त्यांनी जेम्स बाँडम्हणून मोठा मानसन्मान प्राप्त केला.  

मुंबई -  इयान फ्लेमिंग लिखित जेम्स बाँड  चित्रपटांतील पहिला बॉड म्हणून ज्यांचे नाव घ्यावे लागते अशा सिन कॉनेरी यांचे काल वार्धक्याने निधन झाले. त्यांनी आपल्या अभिनयाने जेम्स बाँड हे पात्र अजरामर केले. त्या भूमिकेला न्याय देऊन संपूर्ण जगभरात जेम्स बाँडच्या नावाचे आकर्षण तयार करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. 007  ही जेम्स बाँडची खास ओळखही होती. त्या अंकाबद्दल कायमच रसिकांच्या मनात गुढ असल्याचे दिसून आले.

कॉनेरी यांचे निधन ज्या दिवशी झाले त्या सर्व अंकांची बेरीज केल्यानंतर 007 हा कोडवर्ड येत असल्याचे गणित बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी मांडले आहे. विशेष म्हणजे त्याबद्दलची एक खास पोस्टही त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेयर केली आहे. कॉनेरी यांच्या बाँडपटांनी जगभरातल्या प्रेक्षकांना वेड लावले होते. 1962 मधील बॉड चित्रपटात त्यांनी काम केले होते. जेम्स बाँडच्या एकूण सहा चित्रपटांमध्य़े त्यांनी काम केले. त्यांना त्यांच्या अभिनयातील कौशल्याबद्दल 2000 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्याकडून गौरविण्यात आले होते.

अशा या महान अभिनेत्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. त्यात एका ऑस्करचा समावेश आहे. तसेच त्यांनी तीन गोल्डन ग्लोब, दोन बाफ्ता पुरस्कारही मिळवले. त्यांच्या जाण्याने बाँडपटाच्य़ा चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कॉनेरी यांनी द क्रुसेड, इंडियाना जोन्स. द हंट फॉर रेड ऑक्टोबर चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. दोन दशके त्यांनी जेम्स बाँडम्हणून मोठा मानसन्मान प्राप्त केला.  From Dr No in 1962, to Never Say Never Again in 1983 हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.

अमिताभ यांनी 007 या अंकाचे गणित पुढील प्रमाणे मांडले आहे.  What is the date today . असे म्हणून त्यांनी सुरुवात केली आहे. 31 . 10 . 20  .. त्यात मिळवा ➡️ .. 3 +1 is 4 .. नंतर हे असे होईल 1 = 5 ..  नंतर  0 .. पुन्हा  2, तर मग, 4+1+2 = 7 ..  नंतर 0 ..
 जसे की, .. 3+1+1+2 = 7 .. आणि 2 zeros before you get there .. 
So .. 007 .. !!
Sean Connery passes away .. he gave life to 007  !! अशा अनोख्या पध्दतीचे गणित बिग बी यांनी मांडले आहे. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांनी मिश्किल टिप्पणी दिली आहे. मात्र त्यांच्या या अनोख्या प्रकारच्या पोस्टला हजारोच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत.ऑगस्टमध्ये कॉनेरी यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्यानंतर आलेल्या जेम्स बाँड अभिनेत्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. त्या दशकातल्या प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणा-या कॉनेरी यांचा चाहतावर्गही लाखोंच्या घरात होता.

 25 ऑगस्ट 1930 रोजी स्कॉटलंड मधील एडिनबर्ग येथे जन्म झालेल्या कॉनेरी यांच्या  Dr No (1962), From Russia With Love (1963), Goldfinger (1964), Thunderball (1965), You Only Live Twice (1967), Diamonds Are Forever (1971), and Never Say Never Again (1983) या सात बाँडपटातील   भूमिका अजरामर आहेत. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big b facebook post on first james bond viral