Bigboss 13 : शेहनाझ कोणाला म्हणाली, I love Him, पारस का, सिध्दार्थ ?

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

Bigboss 13 : बिगबॉस 13 चे सगळे प्रोमो प्रेक्षकांना गोंधळात टाकणारे असतात. त्यामुळे शेहनाझने कोणासाठी तिच्या भावना व्यक्त केल्या याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

मुंबई : बिगबॉस 13 मध्ये प्रेक्षकांसाठी खुपच मजेशीर ठरत आहे.बिगबॉसच्या नुकताच आलेल्या प्रोमोमध्ये पारस छाब्रा घरातून बाहेर जात आहे असे दाखविले जात आहे. तसेच शेहनाझ गिल तिच्या मनातील भावना व्यक्त करताना दाखवत आहे. या प्रमोमध्ये सिध्दार्थ शुक्ला देखील दिसत नाही. बिगबॉस 13 चे सगळे प्रोमो प्रेक्षकांना गोंधळात टाकणारे असतात. त्यामुळे शेहनाझने कोणासाठी तिच्या भावना व्यक्त केल्या याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

बिगबॉसच्या घरात ट्रेन टास्क दरम्यान पारस छाब्रा संचालक म्हणून मनमानी करताना दिसत आहे. कॅपटन्सी टास्कमध्ये माहिरा शर्मा आऊट झालेली असताना पारस शेफाली जरीवालाला टास्कमधून बाहेर काढतो. त्यामुळे घरातील इतर सदस्य चिडतात आणि कॅपटन्सी टास्क रद्द करतात. त्यामुळे पारसला घराच्या बाहेर पाठविणार असल्याचे प्रोमो पाहून वाटते आहे. बिगबॉसचा हा प्रोमो पाहून #SidNaaz म्हणजेच सिध्दार्थ आणि शेहनाझच्या फॅनला धक्का बसला आहे.  कारणस शेहनाझने पारससाठी तिच्या भावना व्यक्त केल्या असे दिसत असल्यामुळे  #SidNaaz चे फॅन नाराज झाले आहेत.  

पण, #SidNaaz च्या फॅनला हे ऐकून नक्कीच आनंद होईल की, शेहनाज गिल पासरसाठी नव्हे तर सिध्दार्थ शुक्लालासाठी भावना व्यक्त करत आहे. कारण बिगबॉसच्या घरातून आज पारस नव्हे तर, सिध्दार्थ शुक्ला बाहेर पडणार आहे अशी चर्चा सुरु आहे सिध्दार्थ शुक्लाला टॉईफॉईड झाल्यामुळे बिगबॉस आणि कलर्स टीमने त्याला बाहेर पाठविणार असे अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे शेहनाझला पारसची नव्हे तर सिध्दार्थ शुक्लाची आठवण येत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shehnaaz Gill Fanpage (@shehnaaz.gill.fanpage) on

दरम्यान, सिध्दार्थच्या फॅन्सनी सिध्दार्थसाठी #KeepGoingSidharthShukla असा ट्रेंड सुरु केला आहे.  शेहनाझने कोणाला  I love him म्हणाली हे जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big boss 13 Shehnaz Gill says I love him but not cleared siddharth or paras