Big Boss 13 : सिक्रेट रुममधून सिद्दार्थला दवाखान्यात केलं भरती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

Big Boss 13 : नेहमीच वादात असणारा सिद्धार्थ शुक्लाला सिक्रेट रुममध्ये पाठविण्यात आलं. त्याच्यासोबत पारस छाबडाही होता. कालच सिद्धार्थचा 39 वा वाढदिवस साजरा झाला. मात्र सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.

मुंबई : बिग बॉसच्या घरामध्ये दररोज काहीतरी ड्रामा होत असतो आणि त्यामुळे शो सतत चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरामध्ये नव्या वाइल्ट कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे आणि दोन सदस्यांना सिक्रेट रुममध्ये पाठविण्यात आलं होतं. त्यानंतर घरातील गेम बदलला. नेहमीच वादात असणारा सिद्धार्थ शुक्लाला सिक्रेट रुममध्ये पाठविण्यात आलं. त्याच्यासोबत पारस छाबडाही होता. कालच सिद्धार्थचा 39 वा वाढदिवस साजरा झाला. मात्र सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.

सिक्रेट रुममधून सिद्धार्थला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. त्याला टायफॉइड झाल्याने दवाखान्यात नेण्यात आलं आहे. रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याने आणि इतर उपाचारांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. 

बिग बॉस शोमध्ये येण्याआधी सर्व सदस्य त्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करतात. त्याच्यानुसार घरातील सदस्यांना भेटण्याची अनुमती नसते. आताही सिद्धार्थला त्याच्या घरातील सदस्यांना भेटण्याची अनुमती नाही. शिवाय त्याच्या नातेवाइकांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 

सिद्धार्थ लवकर बरा होण्यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. सिद्धार्थ घरातील स्ट्रॉंग सदस्य आहे. 'बालिका वधू', 'दिल से दिल तक' या मालिकांमध्ये त्याने मुख्य भूमिकेत काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटात तो आलिया भट आणि वरुण धवन यांच्यासोबत झळकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Boss 13 Siddharth shukla has been admitted to hospital