'तुझं तर तोंडच फोडेल मी आता '; कश्मिराचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

टेलिव्हिजन वाहिनीवरील लोकप्रिय मालिका बिग बॉस ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेली मालिका आहे.

मुंबई -अभिनेत्री कश्मिरा शाह आणि निक्की तांबोळी यांच्यातील भांडणे आता कमालीच्या टोकाला गेली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे हा प्रकार समोर आला आहे. त्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे. कश्मिरा तिच्या बोल्ड अंदाजाबरोबरच आक्रमक स्वभावासाठी प्रसिध्द आहे. मात्र निक्कीनं अस काही वक्तव्य केलं की त्यामुळे कश्मिरा चिडली. त्यावरच ती थांबली नाही तर तिनं निक्कीला धमकीही दिली.

टेलिव्हिजन वाहिनीवरील लोकप्रिय मालिका बिग बॉस ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेली मालिका आहे. वाद नसेल तर बिग बॉस पाहण्यात काही अर्थ नाही अशी मानसिकता प्रेक्षकांची झालेली आहे. अशावेळी त्यात सहभागी झालेले स्पर्धक यांच्यात कुठल्याही कारणावरुन वाद रंगत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गायक कुमार सानू यांच्या मुलानं केलेलं वक्तव्य, भलतेच वादाच्या भोव-यात सापडले होते. आता कश्मिरा शाह आणि निक्की तांबोळी यांच्यातील भांडणे सोशल मीडियावर आली आहेत.

सध्या बिग बॉसचा 14 वा सीझन सुरु आहे. त्यात मागे रुबीना आणि जॅस्मिन, राखी आणि अर्शी यांचा वाद पाहायला मिळाला होता. आता त्यांची जागा कश्मिरा आणि निक्कीनं घेतली आहे. निक्की आणि कश्मिरा यांच्या भांडणाचा जो एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात निक्कीनं कश्मिरामध्ये खरं ऐकून घेण्याची क्षमता नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ‘डिस्पिरेट’असा शब्दही निक्कीनं कश्मिराला वापरल्यानं कश्मिराचा राग अनावर झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर रागाला गेलेल्या कश्मिरानं निक्कीला, ‘अगर तुम वह चुप नहीं हुईं तो वह उनका मुंह तोड़ दुंगी’ असे म्हटली आहे.

 

दुसरीकडे निक्कीही शांत बसलेली नाही. तिनं कश्मिराला तिच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, माझ्याबरोबरही अशाप्रकारच्या गोष्टी बोलु नकोस. अन्यथा मी ही तुझे तोंड फोडेल. अशाप्रकारे दोघीमधील वादावादी सुरु असताना त्यांना शांत राहण्याचा सल्ला इतर सहकारी देत आहेत. कश्मिराला आता यंदाच्या बिग बॉसच्या सीझन मधून बाहेर काढायला हवे. असे निक्की सांगते. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big boss 14 kashmira shah and nikki tamboli abusing video viral