तेजस्वी प्रकाश विनर कशी झाली?हे तर फिक्स्ड,ट्वीटरवर नवीन वाद सुरू....Tejasswi Prakash | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big boss 15 Winner Tejasswi Prakash

तेजस्वी प्रकाश विनर कशी झाली?हे तर फिक्स्ड,ट्वीटरवर नवीन वाद सुरू....

अखेर चार महिन्यांच्या तू-तू-मै-मै नंतर 'बिग बॉस 15' (Big boss15)विनरची ट्रॉफी तेजस्वी प्रकाशनं(Tejasswi Prakash) पटकावली आहे. या शो मध्ये तेजस्वी प्रकाशने सुरवातीपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिनं अनेकदा अक्षेपार्ह विधानं केली होती,विचित्रपणाही केला होता पण तरीही बऱ्याचदा आपल्या निरगस वागण्यानं तिनं पुन्हा प्रेक्षकांना आपल्यात गुंतवून ठेवण्यात यश मिळवले होते. करण कुंद्रासोबतच्या तिच्या प्रेमप्रकरणाला तर लोकांनी इमोशनल मुद्दा बनवत 'तेजारन' असं नावही या जोडीला ठेवलं. तेजस्वी प्रकाश प्रतिक सहेजपालपेक्षा अगदी थोड्या फरकाने जिंकली अनं विजेती ठरली. तेजस्वी प्रकाशला निर्मात्यांकडून बिग बॉस 15 च्या ट्रॉफीसह, एकूण 40 लाख रुपये बक्षीस रक्कम देखील मिळाली आहे. इतकंच नाही तर 'नागिन 6' साठीही तिचा विचार केला जातोय अशी बातमी आहे.

हेही वाचा: 'भिकार मालिका पाहणं बंद करा'..विक्रम गोखले पुन्हा गरजले

पण विजयाचा सहज आनंद घेता येईल तर त्या विजयात मजा ती काय. म्हणजे आता नवीन बातमी समोर येत आहे की ट्विटरवर ('TATTI CHANNEL COLORS TV') टट्टी चॅनेल कलर्स टि.व्ही हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. आतापर्यंत 1.07 मिलीयन लोकांनी हॅशटॉग वापरला आहे. बिग बॉसची विनर फिक्स्ड? तेजस्वी प्रकाश विजेती कशी झाली? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहे. तेजस्वी प्रकाशच्या विजयावर प्रेक्षकवर्ग जास्त खूश नाही आहे हे यातून दिसून येत आहे. तेजस्वी प्रकाश हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. तेजस्वी प्रकाशने अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आत्तापर्यंत तेजस्वी प्रकाशने अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये भाग घेतला आहे. ‘स्वरागिनी’पासून ‘पहरेदार पिया की’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का 2’ पर्यंत अनेक शोमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

बिग बॉसच्या चाहत्यांनी “टट्टी चॉनेल कलर्स टिव्ही” हा हॉशटॉग वापरत अनेक मीम शेअर केले आहेत. आपल्या विरोधात सुरु असलेल्या ट्वीटरवरील वादावर तेजस्वी प्रकाश किंवा कलर्स वाहिनी काय उत्तर देते याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे.

Web Title: Big Boss 15 Winner Fixedtwitter Trendnew Controversyentertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top