हिंदीतही उडणार धुरळा! बिग बॉस १६ ची मोठी घोषणा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss 16: Trailer of Salman Khan's show is out. Premiere, release date, key details

हिंदीतही उडणार धुरळा! बिग बॉस १६ ची मोठी घोषणा..

Bigg Boss 16: सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिना आला की बिग बॉसचे वेध लागतात. बिग बॉस चे 15 वे पर्व हीट झाल्यानंतर नवे पर्व कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. अखेर बिग बॉस १६ ची प्रतिक्षा संपली आहे. कलर्स वाहिनीने बिग बॉस 16 लवकरच सुरू होत असून त्याचा दमदार प्रोमो काही दिवसांपूर्वीचटे लिकास्ट केला. मात्रा हा शो पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे. (Big Boss 16: Trailer of Salman Khan's show is out. Premiere, release date, key details )

एका माध्यमाने दिलेल्या माहिती नुसार बिग बॉस १ ऑक्टोबर रोजी लॉन्च केला जाईल तर काहींच्या मते 15 ऑक्टोबर नंतर बिग बॉसचा 16 वा सीजन सुरू होईल. त्यामुळे अवघ्या एका महिन्यावर किंवा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरवर्षी प्रमाणे, सलमान खानच बिग बॉसच्या नव्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या प्रोमोमध्ये तो '15 सालो मे सबका खेल देखा इस बार बिग बॉस खुद खेलेंगे' अशी घोषणा करण्यात आली तर दुसऱ्या टीझरमध्ये बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान म्हणाला की, "नियम ये है की कोई नियम नहीं है". या टीजर मधून बिग बॉसचे यंदाचे घर कसे असेल याचा अंदाज आलेला आहे. अत्यंत गूढमय असा लुक बिग बॉस च्या घराला देण्यात आला आहे.

यावेळी शुभांगी अत्रे, जन्नत जुबेर, नुसरत जहाँ, फहमान खान, टीना दत्ता आणि मुनावर फारुकी यांच्यासह लोकप्रिय कलाकारांना स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्यात आला असल्याची चर्चा आहे. पण नेमकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतेय हे लवकरच कळेल.

गेल्या वर्षी बिग बॉस चे 15 वे पर्व तेजस्वी प्रकाशने जिंकले होते. तिने प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा या जोडीला हरवले आणि ट्रॉफीची विजेती झाली, सध्या ती एकता कपूरच्या थ्रिलर नागिन ६ मध्ये दिसत आहे. थोडा भांडण,नाटक, भावना,आणि प्रेम यांनी भरलेला बिग बॉस १६ मध्ये काय नवीन असेल हे लवकरच प्रेक्षकांना बघता येणार आहोत.

टॅग्स :Big Bossbigg boss