अभिजित बिचुकले पुन्हा 'बिग बॉस'मध्ये...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकलेची कारागृहामधून आज (शनिवार) सुटका झाली असून, तो पुन्हा 'बिग बॉस' प्रवेश आहे.

पुणे: 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकलेची कारागृहामधून आज (शनिवार) सुटका झाली असून, तो पुन्हा 'बिग बॉस' प्रवेश आहे. सोमवारी प्रसिद्ध होणाऱया भागामध्ये तो दिसू शकेल, अशी माहिती सूत्रांनी आज दिली.

धनादेश न वठल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बिचुकलेला "बिग बॉस'च्या घरातून 21 जून रोजी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर शनिवारी (ता. 22) त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन फेटाळल्यामुळे बिचुकलेची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात केली होती. कारागृहातून आज सुटका झाली. अभिजीत बिचुकलेवर कारवाई झाल्यामुळे पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र, तो पुन्हा 'बिग बॉस' घरात प्रवेश करणार आहे. 'बिग बॉस'च्या पहिल्या दिवसापासून अभिजीत बिचुकले विविध गोष्टींमुळे चर्चत आला होता.

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणारा अभिजीत बिचुकलेनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्याने कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big boss abhijit bichukale soon to return in big boss house