Big Boss Marathi 4: 'ए किरण माने, तुला..,' अपुर्वा नेमळेकरची जीभ घसरली... Kiran mane and Apurva Nemlekar Fight | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss Marathi 4,fight between Apurva And Kiran Mane

Big Boss Marathi 4: 'ए किरण माने, तुला..,' अपुर्वा नेमळेकरची जीभ घसरली...

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात आता वातावरणं तंग होत चाललंय. वाद हळूहळू डोकं वर काढतायत. आतापर्यंत घरातल्या सदस्यांचा कोणालाच अंदाजा लागत नव्हता, कोण कसं आहे हे काही केल्या कळत नव्हतं. काही टी.व्ही कलाकार आधीपासून माहीत होते खरे पण प्रत्यक्षात ते गेम खेळताना कसे वागतील याविषयी सर्वसामान्य प्रेक्षकांना अंदाज लागत नव्हता. आता बिग बॉसचं घर म्हटलं की कुणाला आवडेल नुसतं गुळमुळीत सगळं पहायला, वाद नसतील तर काय मज्जा, नाही का. शेवटी ही सर्वसामान्य प्रवृत्तीच असते,स्वतःचं ठेवावं झाकून अन् दुसऱ्याचं पहावं वाकून...(Big Boss Marathi 4, fight between Apurva And Kiran Mane)

हेही वाचा: Big Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात कोण आहे कानफाट्या? अपुर्वानं जाहीर केलं नाव...

आणि त्यात मनोरंजन नगरीकडून प्रेक्षकांनी ही बापडी इच्छा बाळगली तर त्यांचे चुकले कुठे..तर प्रेक्षकहो आता तुम्हाला खरी मजा येणार बिग बॉस मराठी सिझन ४ पाहताना. कारण घरात एवढा मोठा वाद रंगलाय की एकेरी भाषेवर कलाकार उतरलेयत. आपल्या वयापेक्षा मोठ्या कलाकारांनाही खालच्या दर्जाची भाषा वापरली गेलीय. आणि हा मोठा वाद रंगला आहे अपुर्वा नेमळेकर आणि किरण माने यांच्यात...अर्थात भांडण सुरु कुठे झालं अन् वळण घेत कुठे गेलं याचा अंदाजा बातमीत जोडलेल्या प्रोमोवरनं येईलच आपल्याला...तेव्हा आम्ही अधिक बोलण्यापेक्षा आपण प्रोमो पाहूनच अंदाज लावा,नेमकं काय घडलं आहे घरात त्याचा.

त्याचं झालं असं की, किरण माने विकासला म्हणाले "अरे तू शेपूट आहेस, आहेस का?" आणि इथून घरात वादाची ठिणगी पडली. मेघा घाडगे म्हणाल्या, "हे शब्द बोलायची गरज आहे का ? जो बोलतो आहे त्याला बोलत नाही आहेस तू. किरण माने म्हणाले, "तो किती सहन करणार ? चार पाच दिवस सहन करतो आहे तो... त्यावर अपूर्वा भडकली... "ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे......... आणि भांडणं वाढंतच गेलं...

हेही वाचा: Happy Birthday Amitabh: १९९२ ची गोष्ट, जेव्हा जया बच्चन यांच्यावर पत्रकारांसमोरच भडकले होते बिग बी

आता हा वाद कुठवर गेला? पूढे काय झालं ? बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर