Big boss: ट्रॉफी जिंकली नाही पण तरीही नशीब फळफळलं...कोणाचं? Big boss 15 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Kundra,Nishant Bhat,Prateek Sehajpaal

Big boss: ट्रॉफी जिंकली नाही पण तरीही नशीब फळफळलं...कोणाचं?

बिग बॉस(Big boss15) हा छोट्या पडद्यावरचा नेहमीच वादांमुळे चर्चेत राहणारा शो. पण तितकाच लोकप्रिय देखील आहे हा शो. या शो मध्ये आल्यानंतर अनेकजणांच्या करिअरला गती मिळाली असं अनेकदा दिसून आलं आहे. अलिकडचेच उदाहरण घ्यायचं झालं तर शहनाझ गिलला आधी कोण ओळखत होतं; पण बिग बॉस मध्ये आल्यानंतर मात्र तिनं अनेक नवीन प्रोजेक्टसवर आपलं नाव कोरलं. मग ते व्हिडीओ सॉंग असू दे की एखादा सिनेमा. ती चर्चेत आली. आणि एकदा सलमान खानच्या गूड लूक मध्ये आली म्हणजे नक्कीच काम मिळणार हे ठरलेलं. असो,आपण बोलत आहोत ते यंदाच्या 'बिग बॉस सिझन 15' मधील निशात भटविषयी. तर सांगितलं जात आहे की बिग बॉस शो संपत नाही तोपर्यंत निशांतकडे आणखी एक मोठा प्रोजेक्ट चालून आला आहे. काय आहे नेमका तो प्रोजेक्ट. जाणून घेऊया.

Nishant Bhat

Nishant Bhat

निशांत हा एक कोरिओग्राफर आहे. त्यामुळे त्याला त्याच्या आवडीच्या कामासंदर्भातच हा प्रोजेक्ट मिळालेला आहे. तो लवकरच एका शो मध्ये झळकणार आहे. कलर्स हिंदी वाहिनीवर लवकरच 'डान्स दिवाने ज्युनिअर' हा शो तो जज करताना दिसणार आहे. अर्थात अद्याप मेकर्सनी या शो विषयी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. निशांतला आपण 'बिग बॉस सिझन 15' मध्ये येण्याआधी बिग बॉस ओटीटी मध्ये पाहिलं आहे. आपल्या वेगळ्या गेम खेळण्याच्या पद्धतीमुळेच त्यानं 'बिग बॉस 15' मध्येही अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. इतकंच काय या सिझनमध्ये सामिल लाईव्ह ऑडियन्सच्या वोटिंग दरम्यान निशांतने एंटरटेनर नंबर १ चा खिताब जिंकला होता.

Web Title: Big Boss Season 15 Contestant Get New Project After The Show He Is A Choregrapher Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top