
Big boss:''तुमचं नशीब तुमची आई ठरवणार'';सलमान असं का म्हणाला?
छोट्या पडद्यावरचा सर्वात जास्त वादात अडकलेला आणि चर्चेत राहिलेला रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस(Big boss15). बिग बॉसचा सिझन १५ आता त्याच्या अंतिम टप्प्याच्या दिशेने प्रवास करीत आहे. शो च्या ग्रॅंड फिनालेला सुरुवात झाली आहे. पुढील २४ तासात शो च्या विजेत्याचं नाव घोषित केलं जाईल. सध्या टॉप सहा मध्ये शमिता शेट्टी,तेजस्वी प्रकाश,निशांत भट्ट,प्रतिक सहजपाल,रश्मि देसाई,करण कुंद्रा हे स्पर्धक आहे. यामधूनच एक ३० जानेवारीला बिग बॉस सीझन १५ ची ट्रॉफी जिंकणार आहे.
हेही वाचा: Podcast :'कमरेखालचे विनोद म्हणजे...' श्रेया बुगडेनं मारला सिक्सर
शो च्या अंतिम सोहळ्याची रंजकता वाढविण्यासाठी शो ची क्रिएटिव्ह टीम वेगवेगळ्या प्रकारची वळणं शो मध्ये आणत आहे. त्याचे प्रोमोज सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. काही वेळापूर्वीच वाहिनीने इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये शो चा होस्ट सलमान खानच्या(Salman Khan) सोबत सहा स्पर्धकांच्या माताही दिसत आहेत. आपल्या आईला पाहून प्रत्येक स्पर्धक भावूक झालेला दिसत आहे.
हेही वाचा: शाहरुख,सलमान,हृतिक स्पाय थ्रीलरसाठी एकत्र?
तेवढ्यात सलमान घोषणा करतो की, ''आज तुम्हा प्रत्येकाची आई इथे आली आहे, ते तुमचं नशीब,तुमचं भाग्य ठरवण्यासाठी. तुमच्यापैकी ज्याला लोकांनी कमी वोट्स दिले असतील त्याला त्या इथून घेऊन जातील''. आता यावरून एवढं तर पक्क झालं आहे की एक स्पर्धक शो मधून बाहेर पडणार आहे. त्या प्रोमोला कॅप्शन दिलं आहे की,'होगा ये एक्स्ट्रा मुश्किल जब टॉप ६ की मॉम्स रिवील करेंगी उनका भाग्य. किसे कहना पडेगा आज जंगल को अलविदा?'. आता हे पहायचं की अंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचल्यावर कुणाला नशिबानं हुलकावणी दिली आहे.