नुसतीच हवा... 

संकलन : भक्ती परब  
बुधवार, 22 मार्च 2017

11 ऑक्‍टोबर 2015 ला "एम टीव्ही इंडिया' या वाहिनीवर सुरू झालेली "बिग एफ' ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. तेव्हा ही मालिका एकेक तासाच्या फक्त 14 भागात आटोपती घेण्यात आली होती. बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असलेली ही मालिका लवकरच दुसरा सीझन घेऊन अवतरेल, असं सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे प्रेक्षकांनी वाट पाहिली आणि आता या मालिकेचा दुसरा सीझन 12 मार्चपासून सुरू झालाय. पण प्रेक्षकांना तो फार काही रुचला नाहीय. त्यांना पहिला एपिसोड पाहून असं वाटलं की, हा तर पीटीकेकेचा (प्यार तूने क्‍या किया) एपिसोड वाटतोय.

11 ऑक्‍टोबर 2015 ला "एम टीव्ही इंडिया' या वाहिनीवर सुरू झालेली "बिग एफ' ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. तेव्हा ही मालिका एकेक तासाच्या फक्त 14 भागात आटोपती घेण्यात आली होती. बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असलेली ही मालिका लवकरच दुसरा सीझन घेऊन अवतरेल, असं सांगण्यात आलं होतं. त्याप्रमाणे प्रेक्षकांनी वाट पाहिली आणि आता या मालिकेचा दुसरा सीझन 12 मार्चपासून सुरू झालाय. पण प्रेक्षकांना तो फार काही रुचला नाहीय. त्यांना पहिला एपिसोड पाहून असं वाटलं की, हा तर पीटीकेकेचा (प्यार तूने क्‍या किया) एपिसोड वाटतोय. माणसाच्या मनातील अतृप्त इच्छा (विशेषतः लैंगिग भावना) ज्या तो सहसा व्यक्त करत नाही आणि व्यक्त केल्याच तर त्याला लाज वाटते किंवा भीती वाटते. समाज काय म्हणेल? अशा भावना पहिल्यांदाच "बिग एफ' मालिकेतून मांडण्यात आल्या. त्यामुळे पहिल्या सीझनमधील 14 भागांवर तरुणाईच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया आणि चर्चा झडत होत्या. पहिल्यांदाच तरुणाई या मालिकेच्या निमित्ताने आडपडदा ठेवला जाणाऱ्या भावनांविषयी मोकळेपणाने व्यक्त होत होती. असा सगळा बिग एफचा पूर्वेतिहास असताना प्रेक्षकांची साहजिकच या नव्या सीझनकडून खूप अपेक्षा होती. पण ती काही पूर्ण झालेली नाही. या सीझनच्या निवेदकासाठी रणदिप हुडाला पाचारण करण्यात आलंय आणि या नव्या सीझनचा विषय आहे "स्त्रियांच्या मनातील दबल्या गेलेल्या इच्छा.' भारतीय समाजात महिला लैंगिग भावनेविषयी कुणाशी मनमोकळेपणाने बोलत नाहीत. तेव्हा हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून "बिग एफ'च्या दुसऱ्या पर्वाची निर्मिती करण्यात आलीय. आता बघूया, पुढे यापेक्षा चांगली कथा असलेले भाग बघायला मिळतील का ते. सध्या दोन एपिसोड झालेत. बाकी पहिल्या एपिसोडमध्ये शांतनु माहेश्‍वरी, चेरी मर्दीया आणि सलोनी दैनी यांनी मात्र अभिनयाची बाजू चोख सांभाळली होती... 

Web Title: Big F shantanu maheshwari