Bigboss 13 : सलमान खान सोडणार बिगबॉस शो?

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

Bigboss 13 : सलमानने जवळपास 10 सिझन बिगबॉस होस्ट केले आहे. बिगबॉस 13 सिझन हा सलमान खानचा शेवटचा सिझन असेल कारण...

मुंबई : बिगबॉस आणि सलमान खान हे समीकरण म्हणजे फुल एन्टेंरटेन्टमेंट. प्रेक्षकांना बिगबॉसचा होस्ट म्हणून सलमान खान यालाच पाहायला आवडते. सलमानने जवळपास 10 सिझन बिगबॉस होस्ट केले आहे. बिगबॉस 13 सिझन हा सलमान खानचा शेवटचा सिझन असेल कारण, सलमान खान बिगबॉस शो सोडून देणार आहे अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सलामानचे चाहते मात्र, नाराज आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Promotions chalu! #Dabangg3 @skfilmsofficial

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

बिगबॉस हा शो मध्ये सतत वाद होत असतात. घरातील सदस्य एकमेंकासाठी अपशब्द वापरतात, तर कधी धक्काबुक्की करतात. सलमान खानला होस्ट म्हणून या सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतात. बिगबॉसच्या घरातील सदस्यांना सलमान खान खूप चांगल्या रितीने हँन्डल करु शकतो असे प्रेक्षकांना नेहमीच वाटते. पण, सदस्यांना सांभळतांना बिगबॉस शो होस्ट करताना सलमानचा राग कित्येकदा अनावर होतो. त्याच्या या रागामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान नुकाताच 'ट्रायजेमिनल न्यूरल्जिया' या आजारातून बरा झाला आहे. सलमानला खूप राग आल्यास त्याच्या मज्जातंतू आणि नसांना धक्का पोहचून त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

बिगबॉसच्या 13 मध्ये मागील आठवड्यात, सलमानने रश्मी देसाईसमोर तिच्या बॉयफ्रेंन्ड अरहान खानच्या पहिल्या लग्न आणि मुलाचे सत्य उलघडले. त्यावेळी सलामान अरहानवर प्रंचड चिडला होता, त्यामुळे त्याचा राग अनावर झाला होता. सलमानला त्याचा रागावर निंयत्रण ठेवून शांत व्हायला काही वेळ लागला. बिगबॉसच्या घरात प्रत्येक आठवड्यात काही ना काही घडत असते त्यामुळे सलमान खानचा राग अनावर होतो. त्यामुळे बिगबॉसचा होस्ट म्हणून सलामानचा हा शेवटचा सिझन असेल. 

बिगबॉसच्या 13 सिझन 5 आठवड्यानी वाढल्यामुळे सलमान हा शो सोडणार असल्याची सुरु होती. तसेच सलमान खान नंतर फरहान खान  होस्ट करणार आहे अशी चर्चा सुरु आहे पण, याबाबत अद्याप बिगबॉस टिमने काहीही सांगितले नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigboss 13 salman khan going to leave the show