
Bigg Boss ट्रॉफी जिंकणाऱ्या MC Stanचं खरं नाव काय? त्याला MC हे नाव कसं पडलं?
मराठमोळा रॅपर एमसी स्टॅन हा हिंदीतील बिग बॉस 16 या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर अमरावतीचा शिव ठाकरे हा "फर्स्ट रनर अप" ठरला. रविवारी रात्री झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात अभिनेता सलमान खान याने विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. तर विजेत्या एमसी स्टॅनचं खरं नाव काय आहे? आणि त्याला हे नाव कसं पडलं यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
एमसी स्टॅन हा भारतीय रॅपर आहे. इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असतानाच त्याला रॅप साँगचे वेड लागले. त्याच्या भावाने त्याची आवड ओळखून त्याला रॅप साँगचे शिक्षण दिले. त्यातूनच पुढे एमसी स्टॅन हा रॅप साँग लिहायला लागला आणि पुढे प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याचे खरे नाव अल्ताफ तडवी असून तो पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात राहायचा. काही वर्षापूर्वी तो आणि त्याचे कुटुंबीय मुंबईत राहण्यासाठी गेल्याची माहिती आहे.
एमसी स्टॅन हा तो प्रसिध्द अमेरिकन रॅपर एमिनेमचा चाहता आहे, एमिनेमला त्याच्या चाहत्यांनी स्टॅन हे नाव दिले आहे. त्यावरूनच त्याने स्वतःचे नाव एमसी स्टॅन असे ठेवलं आहे. MC म्हणजे Master Of Ceremony. तेव्हापासून तो MC Stan या नावाने प्रसिद्ध आहे.
एमसी स्टॅनचे वडील रेल्वेमध्ये हवालदार पदावर कार्यरत आहेत. ते पुण्यातील ताडीवाला रोड भागात राहण्यास होते. त्याची आई गृहिणी आहे. 15 वर्षापूर्वी त्याच्या कुटुंबीयांनी पुणे सोडले असून सध्या ते मुंबई मध्ये वास्तव्य करीत आहेत. एमसी स्टॅनच्या विजयानंतर ताडीवाला रोड भागात जल्लोष करण्यात आला, अशी माहिती सुजित यादव यांनी दिली.