Bigboss13 : आता गेम पलटणार; सिद्धार्थ आणि पारस सिक्रेट रूममध्ये

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

Bigboss13 : बिगबॉसच्या घरात पुन्हा एका नव्या वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे. तर  दोन सदस्यांना सिक्रेट रुममध्ये पाठवलं आहे.

मुंबई : बिगबॉस हा नेहमीच चर्चेत असून 13 व्या सिझनमध्ये सतत नवीन ट्विस्ट पहायला मिळतात. बिगबॉसच्या घरात पुन्हा एका नव्या वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे. तर  दोन सदस्यांना सिक्रेट रुममध्ये पाठवलं आहे. त्यामुळे  बिगबॉसच्या घरातील वातावरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. 

बिगबॉस 11च्या सिझनचा फायनालिस्ट सदस्य मास्टरमाँईड विकास गुप्ता याची विकेएंडला घरात पुन्हा एन्ट्री झाली आहे तर, काल सिद्धार्थ शुक्ला आणि पारस छाब्रा यांना सिक्रेट रूममध्ये पाठवले आहे. सिध्दार्थ आणि पारस या सिझनमध्ये खूप चांगला गेम खेळत आहेत. 

एका टास्क दरम्यान, पारसच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला मागील आठवड्यात सर्जरीसाठी घराबाहेर पाठविले होते.  तर, सिद्धार्थ देखील टॉइफोईड झाला असून त्याच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. दरम्यान, सिद्धार्थला उपचारा आणि आरमासाठी मुख्य घराबाहेर जावे लागेल असे सांगून सिक्रेट रूममध्ये पाठविले आहे. तर पारस देखील  सर्जरी नंतर पुन्हा बिगबॉसच्या घरात आला असून त्याला सिक्रेट रुममध्येच ठेवले आहे. दोघेही सिक्रेट रूममध्ये बसून घरात काय सुरू आहे यावर नजर ठेवत आहे. त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील इतर सदस्य काय रिअॅक्ट करतायेत, काय गेम खेळताय हे पाहण्याची संधी दोघांना मिळाली आहे. 

दुसरीकडे, विकास गुप्तच्या एन्ट्री मुळे घरातील काही सदस्य खूष आहेत तर काही नाराज. सिद्धार्थ घराबाहेर गेल्यामुळे शेहनाज गिल मात्र खूपच उदास झाली आहे. घरातील सर्व सदस्यांना माहित नाही की सिद्धार्थ आणि पारस सिक्रेट रूममध्ये आहेत. त्यामुळे बिगबॉसचा गेम आणखीनच मजेशीर होणार आहे. सिद्धार्थ आणि पारस दोन दिवस सिक्रेट रूममध्ये राहणार असुन बुधवारी पुन्हा घरात जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigboss13 New twist in game siddharth and paras into secret room