Big Boss 13 : अमिषाच्या ओव्हरअॅक्टींगवर नेटकरी म्हणाले, 'ओ स्त्री कल मत आना'

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

अमिषाची ओव्हरअॅक्टींग पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.तिच्या या ओव्हरअॅक्टिंगचे नेटकऱ्यांनी अनेक मीम्स तयार केले आहेत. 

मुंबई : बिग बॉसचं 13 वं पर्व सुरु झालं असून काही दिवसांतच घरातील वादांना सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल याची कल्पनाही करता येणार नाही. त्याचसोबत गेमला आणि स्वत: ला कॅमेरासमोर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही मंडळी काही करायला तयार असतात. प्रत्येक सिझन नवीन प्रयोग करत असतं. आताही असचं काहीसं घडलं आहे, यावेळी घराचे मालक बिग बॉस नसून मालकिणीचा हक्क अभिनेत्री अमिषा पटेल हिच्याकडे आले आहेत. मात्र कार्यक्रमाला एक आठवडाही झाला नसून प्रेक्षक तिच्या वागण्याला कंटाळले आहेत. 

तिची ओव्हरअॅक्टींग पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तिचा हा मालकिणी रुपातला अंदाज प्रेक्षकांना भोवला नाही उलट त्याला विरोधच केला जात आहे. एवढचं काय तिला घरातून हाकलविण्याची मागणी अनेकांनी केली आहे. तिच्या या ओव्हरअॅक्टिंगचे नेटकऱ्यांनी अनेक मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स इंटरनेटवर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. काही प्रसिद्ध चित्रपटातील डायलॉगच्या आधारे हे मजेशीर मीम्स तयार करण्यात आले आहेत. 'ओ स्त्री कल मत आना, सेह लेंगे थोडा, मैंडम मैं आपको घर छोडके आऊं?' अशा प्रकारचे मीम्स इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. 

काही हुशार युजरनी तर गंमतीशीर कमेंटही केल्या आहेत. त्यामध्ये एकाने लिहिलं आहे,' बिग बॉस चाहते है की अमिषा पटेल ओव्हर अॅक्टिंग ना करे'. एकाने तर लिहिलं आहे की,' तु सस्ता म्हणालास, मला अमिषा पटेल ऐकू आलं'. 

बॉलिवूड अभिनेत्री पूर्ण सिझनमध्ये राहणार आहे का नाही याविषयीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तिच्या अशा वागण्याला कंटाळलेले प्रेक्षक आणि त्यांचा विरोध पाहता बिग बॉस आता पुढे काय करणार हे बघावं लागेल. सिद्धार्ध शुक्ला, रश्मी देसाई, कोईना मित्रा, देबोलिना भट्टाचार्य आणि आरती सिंह असे काही प्रसिद्ध कलाकार आताच्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये दिसत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss 13 Ameesha Patel receives flak for her overacting, trollers made funny memes