सिद्धार्थ शुक्ला ठरला बिग बॉस 13चा विनर

टीम ई-सकाळ
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

पहिल्यांदाच असं झालं की, शोच्या फिनालेसाठी 6 सदस्य राहिले आहेत. दर वेळी नेहमी शेवटी फक्त 5 सदस्य राहतात.

पुणे : क्षणा क्षणाला उत्सुकता वाढवणाऱ्या बिग बॉस 13च्या Big Boss 13 ग्रँड फिनालेमध्ये आज, सिद्धार्थ शुक्लानं बाजी मारली. टॉप थ्रीमध्ये सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla),आसिम रियाज (Asim Riaz),शहनाज गिल (Shehnaaz Gill)यांनी स्थान मिळवलं होतं. त्यानंतर शहनाज बाहेर पडली आणि सिद्धार्थ आणि आसिम यांच्यात सामना रंगला. या दोघांसाठी 15 मिनिटांचं लाईव्ह वोटिंग घेण्यात आलं. त्यात सिद्धार्थच्या बाजूनं सर्वाधिक मतं पडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'बिग बॉस' 13 सीझन हा बिगबॉसच्या इतर सिझनपेक्षा जास्त लोकप्रिय ठरला. आधीच्या सिझनमध्ये न घडलेल्या अनेक गोष्टी या सिझनमध्ये झाल्या. या शोचा टीआरपी आणि फॅन फॉलोइंगही जास्त होतं. पहिल्यांदाच असं झालं की, शोच्या फिनालेसाठी 6 सदस्य राहिले आहेत. दर वेळी नेहमी शेवटी फक्त 5 सदस्य राहतात. बिग बॉसच्या या सिझनमध्ये एन्टेंरटेंन्टमेंट, ड्रामा, एक्शन, लव्ह,-हेट, फ्रेन्डशीप, प्लॅनिंग स्ट्रेट्रजी , गॉसिप सगळे काही एक्स्ट्रा तडका होता. फिनालेच्या वेळी टॉप सिक्समध्ये सिध्दार्थ शुक्ला, शेहनाझ गिल, आसिम रियाझ, रश्मी देसाई, पारस छाब्रा, आणि आरती सिंग हे कंटेस्टंट राहिले होते.

मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

रेकॉर्ड ब्रेक टीआरपी, पाच आठवडे वाढवले
बिग बॉसच्या 13 चा टेडा ठरलेला आहे. बिगबॉसच्या सिझनमध्ये सुरवातीस एका महिन्यातच फर्स्ट फिनालय राऊंड झाला, ज्यामध्ये टॉप सिक्सला एन्ट्री दिली होती ज्यामध्ये सिध्दार्थ , शेहनाझ, आरती, आसिम, पारस आणि माहिरा यांनी बाझी मारली होती. त्यांनतर वाईल्ड कार्ड एन्ट्री गेम चेंजर ठरल्या. सिध्दार्थ आसिमची मैत्री असो वा दुश्मनी असो, रश्मीची सिध्दार्थ सोबतचे वाद असो किंवा अरहान सोबतचे रिलेशनशीप असो, शेहनाज आणि सिध्दार्थची नोकझोक असो मैत्रीच्या पलीकडे पण, प्रेमाच्या अलीकडे असलेल नातं, आरतीचे इनडिपेंडट गेम असो किंवा दुसऱ्यांच्या भांडणात पडणे असो किंवा पारसचा संस्कारी प्लेबॉयवाले गेम्स असो की टास्क रद्द करणे असो, या सिझनमध्ये सगळेच प्रेक्षकांच्या पंसतीस उतरले. प्रत्येकाने आपला चाहाता वर्ग तयार केला आणि प्रेक्षकांना भरपूर एंटरटेन केलं. या सिझन इतका हिट झाला की, 5 आठवडे वाढवण्यात आले. या वेळी बिगबॉस 13 सिझनने टीआरपीचे रेकार्ड ब्रेक केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 13 season grand finale winner siddharth shukla

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: