Big Boss 13 च्या बक्षिसाची रक्कम झाली दुप्पट ? मिळणार इतके कोटी...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बिग बॉसच्या घरात कधी काय होईल हे सांगता येणार नाही. घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने ड्रामा हा होतच असतो. पण, या सिझनमध्ये याआधी न झालेल्या गोष्टी घडत आहेत. या सीझनच्या विनरला मिळणाऱ्या रकमेत वाढ झाली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. 

मुंबई : 'बिग बॉस' 13 सीजनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बिगबॉस आणि सलमान खान हे समीकरण म्हणजे फुल एन्टेंरटेन्टमेंट. प्रेक्षकांना बिगबॉसचा होस्ट म्हणून सलमान खान यालाच पाहायला आवडते. सलमानने जवळपास 10 सिझन बिगबॉस होस्ट केले आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय होईल हे सांगता येणार नाही. घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने ड्रामा हा होतच असतो. पण, या सिझनमध्ये याआधी न झालेल्या गोष्टी घडत आहेत. या सीझनच्या विनरला मिळणाऱ्या रकमेत वाढ झाली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. 

बिग बॉस 13 सिझन लवकरच संपणार आहे. बिग बॉस 13 च्या फिनालेला आता फक्त एक दिवस उरला आहे. 15 फेब्रुवारीला देशाला सर्वात मोठ्या रिअलिटी शोचा विनर जाहिर होईल. शो मध्ये आता शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह हेच सदस्य राहिले आहेत. विनरला प्राइझ मनी किती मिळणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम आहे. काही सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळच्या सिझनला विनर प्राइझमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

यापूर्वी झालेल्या सिझनमध्ये जिंकलेल्या सदस्याला 50 लाख एवढ रक्कम मिळाली होती. या सिझनसाठी मात्र बक्षिसाची रक्कम तब्बल दुप्पट करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी मात्र बिग बॉसच्या निर्मात्यांनी याची अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे यावेळी सिझन 13 च्या विजेत्याला थेट 1 कोटी रुपये बक्षिस मिळणार का याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. 

याविषयीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. ' बिग बॉस' शोचं 13 वे सिझन हे इतर पर्वांपेक्षा लोकप्रिय ठरलं. आधीच्या सिझनमध्ये न घडलेल्या अनेक गोष्टी या सिझनमध्ये झाल्या. या शोचा टीआरपी आणि फॅन फॉलोइंगही जास्त आहे. काल झालेल्या एपिसोडमध्ये माहिरा शर्मा घरातून बाहेर पडली. भूत सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेला विकी कौशल घरातून जाताना माहिराला घेऊन गेला. पहिल्यांदाच असे झाले आहे की, शोच्या फिनालेसाठी 6 सदस्य राहिले आहेत. नेहमी शेवटी फक्त 5 सदस्य राहतात. आता राहिलेल्या सदस्यांपैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी घरी घेऊन जातं हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss 13 winner prize money has doubled this year