esakal | Bigg Boss 14: मला खरचं तो खूप आवडायचा, पण...

बोलून बातमी शोधा

bigg boss season 14
Bigg Boss 14: मला खरचं तो खूप आवडायचा, पण...
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बिग बॉसचा 14 वा सीझन सर्वांसाठी एक वेगळा अनुभव होता असे म्हणायला हरकत नाही. यंदाच्या बिग बॉसनं अनेक धक्कादायक निकाल दिले होते. शेवटच्या स्पर्धकांमध्ये प्रेक्षकांनी अपेक्षा केलेले स्पर्धक आले नव्हते असेही काही जणांनी म्हटले होते. याच सीझनमध्ये अनेकांची नवी नाती जुळल्याचे दिसून आले. अनेकांनी पुढे लग्नंही केली. आता बिग बॉसचा तो सीझन पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे निक्की तांबोळी. तिनं सोशल मीडियावर जो खुलासा केला आहे. त्यामुळे निक्की काय म्हणते याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे.

एका मुलाखतीमध्ये निक्कीनं धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे तिच्या फॅन्सला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निक्कीनं जे काही सांगितले आहे ते ऐकुन तुम्हालाही नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी एजाज खानची लव स्टोरी सर्वांना माहिती आहे. त्यानं त्या मालिकेतून निरोप घेतल्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम होती. त्याचे एक कारण म्हणजे त्याची लवस्टोरी. निक्कीनं त्या दरम्यान आपलं क्रश कोण होतं याबद्दल सांगितलं आहे. हे ऐकुन तिच्या फॅन्सनं निक्कीला दाद दिली आहे.

निक्कीनं सांगितलं होतं की, तिला अलीबद्दल फारसं आकर्षण वाटतं नव्हतं. मात्र ती जेव्हा घरी आली त्यावेळी तिला कळालं की, तिच्याकडे आणखी काही पर्याय नव्हते. निक्कीनं सांगितलं होतं की आपल्याला अली गोनी आवडत होता. निक्की ज्यावेळी राखीशी बोलत होती तेव्हा तिनं हे सांगितलं होतं. जर अलीनं मला सगळ्यांसमोर विचारलं असतं तर मी त्याला हो म्हणाली असते असेही निक्कीनं सांगितले होते.

निक्कीनं जॅस्मिन भसीनचाही उल्लेख केला होता. मात्र तिनंही सांगितले होते की, मी आणि अली आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. स्पॉटबॉयनं दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाखतीत निक्कीनं सांगितलं होतं की, दररोज एक चेहरा पाहावा लागत आहे. आणि आम्ही तर पाच महिने त्या एकाच घरात आहोत. काहीवेळा आपल्याला असहाय्यतेची जाणीव झाल्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया द्याव्या लागतात.