'काय म्हणावं या बाईला,सगळ्या अंगावर लिहिलं आय लव यु...'

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

गेल्या आठवड्यात सोनाली फोगाट बाहेर पडल्यानंतर आता पुढील दिवसांत काही बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबई - बिग बॉसमधील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात सातत्यानं नवनवीन घटना घडताना दिसत आहे. सध्या राखी सावंतनं या शो ची सगळी सुत्रे हातात घेतली आहेत की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात राखी सावंत चर्चेचा विषय ठरत आहे. ती ज्या प्रकारे वागत त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता तर तिनं हद्द केली आहे.

गेल्या आठवड्यात सोनाली फोगाट या शोच्या बाहेर पडल्यानंतर आता पुढील दिवसांत काही बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. नॉमिनेशन वरुन चर्चा होताना दिसणार आहे. त्यामुळे सोमवारचा शो रंगतदार होण्याची शक्य़ता आहे. त्या एपिसोडचे प्रमोशन सोशल मीडियावर जोरदारपणे सुरु झाले आहे. त्या व्हिडिओची सुरुवात राखी सावंतने केली आहे. त्यात ती अभिनव शुक्लाला सांगते की, मी जर तुझ्यासोबत भांडी घालायला लागले तर तुझ्या बायकोला झोप येणार नाही. यावर राखीला रुबीनानं प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, राखी अशाप्रकारे काही बोलू नकोस. राखी जे काही बोलली त्यामुळे अर्शीलाही आपलं हसणं थांबवता आले नाही. मला अभिनव पासून कोणी वेगळं करु शकत नाही असे राखीचं म्हणणं आहे.

यानंतर राखीनं जे काही केलं त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिनं आपल्या सर्वांगावर आय लव यु असे लिहून लक्ष वेधून घेतले आहे. लाल रंगाच्या लिपस्टिकनं तिनं हे सगळे लिहिले आहे. आय लव यु अभिनव हे लिहिल्यानंतर राखीनं ह्द्याच्या आकाराचे एक इमोजीही तयार केले आहे. हे पाहिल्यानंतर अभिनव तर घाबरुन गेला होता. त्यानं तिला विचारलं की, हे काय आहे, त्यावर राखी म्हणाली, मेरा प्यार क्रेझी है. रविवारच्या एका भागातही राखीनं गंमतीत असे सांगितले होते की, तिनं आपल्या पूर्ण शरीरावर अभिनवच्या नावाचा टॅटू बनवला आहे. आपण त्याच्यावर किती प्रेम करतो हे दाखविण्यासाठी तिनं हे अशाप्रकारची कृती केली होती. 

'राखीचे कपडे फाडले,वडिलांनी घराबाहेर काढले'

राखी अभिनवला विचारते तुला कसे वाटते, त्यावर चिडलेल्या रूबीनानं राखीला सांगितले की, अशाप्रकारे एखाद्याला इंटरटेन करणे चूकीचे आहे. ते चांगले दिसत नाही. त्यावर राखी म्हणाली, माझी बॉ़डी आहे. अर्शीनेही राखीला चेतावनी दिली आहे ती म्हणाली, अशाप्रकारच्या कृतींपासून राखीनं दूर राहिलेले चांगले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 rakhi will be seen in a different style writing i love you Abhinav all over body