'तू कधीही बाप होऊ शकणार नाही!' अर्चनाचा कहर, विकास रडला|Bigg Boss 16 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Archana And Vikas Fight

Bigg Boss 16 : 'तू कधीही बाप होऊ शकणार नाही!' अर्चनाचा कहर, विकास रडला

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात सध्या काही आलबेल चाललेलं नाही. अर्चना आणि विकास यांच्यातील भांडणं चव्हाट्यावर आली आहेत. आता तर अर्चनानं कहर केला आहे. त्यात तिनं नको ती गोष्ट बोलून नेटकऱ्यांचा राग ओढावून घेतला आहे. त्यामुळे ती ट्रोल होताना दिसते आहे.

शालीनच्या पत्नी आणि आईवर केली कमेंट

विकासशिवाय अर्चनानं शालीन सोबतही गैरवर्तन केले आहे. आता तर शालीन बोलताना तिनं पातळी ओलांडली आहे. अर्चनानं त्याची एक्स वाईफ आणि आईवरुन बोलायला मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे शालीन हा भलताच भावूक झाला होता. त्यानं तिला काही न बोलता शांत राहणे पसंत केले. मात्र येत्या दिवसांत सलमान खान या प्रकरणाची दखल घेणार का नाही असा प्रश्न नेटकरी विचारत आहे.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Viral Video : मासे खरेदीसाठी भावाने अख्खी ट्रेन थांबवली

अर्चनाचा हेकेखोरपणा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी तिनं विकासच्या अंगावर गरम पाणी टाकले होते. आता तर तिनं हद्दच केली आहे. आपण कसे वागतो आहोत, बोलतो आहोत याचे तिला भान राहिलेले नाही. असे दिसते आहे. अर्चनाच्या अशा वागण्याचा सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. बिग बॉसच्या सुरुवातीला अर्चनाची क्रेझ होती.

आता अर्चना अनेकांच्या रागाचे कारण ठरताना दिसत आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील स्पर्धक तिला वैतागले आहेत. तिला शो बाहेर करण्याची मागणी त्यांनी बिग बॉसला केली आहे. गेल्या वेळेस तिनं चक्क बिग बॉसनं सांगितलेली गोष्ट नाकारली होती. सलमान खाननं मात्र तिचा चांगलाच क्लास घेतला होता. तुला घरात राहायचं असेल तर सगळ्यांशी नीट वागावे लागेल. असे सलमाननं तिला सांगितले होते.

हेही वाचा: Anant Radhika Roka: कोण आहेत अंबानी कुटूंबाच्या धाकट्या सुनबाई? अनंतचं लवकरच शुभमंगल!

काय म्हणाली अर्चना...

विकासच्या पत्नीचे मिसकॅरेज झाले होते. त्यानं ती गोष्ट भावनेच्या भरात अर्चनालाही सांगितले होते. मात्र अर्चनानं ती गोष्ट गुपीत न ठेवता सगळ्यांना सांगते. तेवढ्यावरच ती थांबत नाही. तर जेव्हा अर्चना आणि विकासची भांडणं झाली तेव्हा मात्र अर्चनानं सारं काही सांगून टाकलं. तिनं विकास तू कधीही बाप होऊ शकणार नाही. अशा शब्दांत तिनं राग व्यक्त केला आहे.