Gori Nagori Attacked: बहिणीच्या लग्नात मेव्हण्याने केली मारहाण... बिग बॉस फेम गोरी नागोरीसोबत धक्क्कादायक प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss 16 fame gori nagori brutally attacked by her brother in law

Gori Nagori Attacked: बहिणीच्या लग्नात मेव्हण्याने केली मारहाण... बिग बॉस फेम अभिनेत्रीसोबत धक्क्कादायक प्रकार

Gori Nagori Attacked News: 'बिग बॉस 16' मध्ये दिसलेली हरियाणवी डान्सर गोरी नागोरी हिला नुकतीच मारहाण झाल्याची घटना समोर आलीय. गोरी नागोरी तिच्या बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अजमेरला गेली होती.

मात्र येथे गोरी नागोरीचे मेहुणे जावेद हुसेनसोबत भांडण झाले. परिस्थिती इतकी बिघडली की गोरी नागोरी यांना बेदम मारहाण करण्यात आली.

इतकंच नाही तर गोरी नागोरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचल्यावर पोलिसांनी तिला मदत केली नाही. उलट तिच्यासोबत सेल्फी काढून तिला घरी पाठवले.

कोणतीही मदत न मिळाल्याने गोरीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे दाद मागितली असून पोलिस कोणताही गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोपही केला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये गोरी नागोरीचा मेहुणा जावेद हुसेन याचं प्लॅनिंग समोर आले आहे.

(bigg boss 16 fame gori nagori brutally attacked by her brother in law)

गोरी नागोरीने मारहाणीचा व्हिडिओ शेयर केलाय. यात माणसं खुर्च्यांची तोडफोड करत आहेत. आणि एकमेकांवर आक्रमक पवित्रा घेत मारहाण करत आहेत.

यात अनेक माणसांच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा झाल्याचं दिसतंय. गौरीने हा व्हिडिओ शेयर करत पोस्ट लिहिली आहे की.. हेल्लो मित्रांनो मी तुमची गोरी नागोरी.... आज माझ्यासोबत जे घडले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून मी हा व्हिडीओ अपलोड करत आहे.

गौरी पुढे लिहिते... "मित्रांनो 22 मे रोजी माझ्या बहिणीचे लग्न होते.. मेव्हणे जावेद हुसेन, ज्याने सांगितले की, तुझे लग्न किशनगडमध्ये करा, मी सर्व व्यवस्था करीन,

म्हणून त्यांच्या सांगण्यावरून मी किशनगडमध्ये लग्न केले आणि मला माहित नव्हते. हा सगळा त्यांचा कट आहे, त्यांनी किशनगडला बोलावून माझ्यावर व माझ्या टीमवर अतिशय वाईट हल्ला केला"

गोरीने हल्ल्याचं वर्णन करताना पुढे सांगितलं की.. "माझा मेहुणा, त्याचा मित्र, भाऊ या सर्वांची मी तक्रार करायला गेलो होतो, पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही.

कौटुंबिक भांडण आपापसात बोलून मिटवा, असं पोलिस मला म्हणाले.. पुढे त्यांनी मला बराच वेळ बसवून ठेवले..

मी पुढे पोलिसांना म्हणाले, सेल्फी घ्या.. मी घरात एकटी मुलगी आहे आणि माझी आई आहे. आणि आम्हाला या सर्व लोकांपासून धोका आहे.

गोरी शेवटी लिहिते.. माझ्या आयुष्याला काही झालं, माझ्या आईला, माझ्या टीमला काही झालं तर त्याला हे लोक जबाबदार असतील, ज्यांची नावं मी व्हिडीओमध्ये घेतली आहेत आणि मी फक्त राजस्थानच्या लोकांना विनंती करेन की त्यांनी मला या सर्व प्रकरणात सपोर्ट करावा.

राजस्थान सरकारकडून, सर अशोक गेहलोत जी आणि सचिन पायलट जी यांनी मला सपोर्ट करावा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा. याशिवाय जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी, माझ्या जीवाला धोका आहे"

गोरीने मुलाखतीत भावना व्यक्त केल्या की.. "भांडणं इतकी झाली की बघ्यांची गर्दी झाली. त्या गर्दीत कोणी माझे केस ओढत आहे, कोणी मला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करत आहे.

माझ्या खांद्यावरही खूप जखमा झाल्या आहेत. मला आणि माझ्या संपूर्ण टीमला बेदम मारहाण झाली. माझ्या मॅनेजरला खुर्च्यांनी मारले. माझ्या बाउन्सरचे डोके फुटले आहे." असा भयंकर प्रकार गोरीच्या बाबतीत घडलाय.