बिग बॉस ग्रॅन्ड फिनालेचा व्हिडीओ लीक? उर्वशी रौतेलाचा परफॉर्मन्स पाहून भडकले लोक..Bigg Boss 16 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 grand finale, urvashi rautela performance leaked online

Bigg Boss 16: बिग बॉस ग्रॅन्ड फिनालेचा व्हिडीओ लीक? उर्वशी रौतेलाचा परफॉर्मन्स पाहून भडकले लोक..

Bigg Boss 16: टी.व्ही रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन १६ आता हळू हळू अंतिम टप्प्याकडे प्रवास करत आहे. एलिमिनेशन च्या माध्यमातून हळूहळू मेकर्स चाहत्यांच्या आवडत्या सदस्यांना शॉर्टलिस्ट करत आहेत आणि आता लवकरच या सीझनचा विजेता निवडला जाईल. पण यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आलेला आहे,ज्यात उर्वशी रौतेला किलर परफॉर्मन्स देताना दिसत आहे. हा व्हिडीओ बिग बॉसच्या ग्रॅन्ड फिनालेचा असल्याचं बोललं जात आहे. (Bigg Boss 16 grand finale, urvashi rautela performance leaked online)

हेही वाचा: Bigg Boss 16: 'बिग बॉसने चिंटींग केली' अंकितला ठरवून शो बाहेर..सोशल मिडीयावर नेटकऱ्यांचा संताप

फॅन पेजवर या व्हिडीओला बिग बॉस ग्रॅन्ड फिनालेचा व्हिडीओ बोललं जात आहे. ज्यात उर्वशी रौतेला परफॉर्म करताना नजरेस पडत आहे. व्हिडीओ बिग बॉसचाच आहे यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय कारण स्टेजवर मागे बिग बॉस लिहिलेलं दिसत आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये मात्र अनेकजण याच्याशी सहमत नाहीत असं दिसत आहे. कारण काही दिवसंपूर्वीच मेकर्सनी शो चा कालावधी वाढणार असल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचा: Bigg Boss : हिंदी बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकाविरोधात पोलीस तक्रार

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे की-'बिग बॉस फिनाले आता होऊच शकत नाही,तो तर फेब्रुवारीत असतो'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की-'हे कधी झालं?'. तर कुणीतरी लिहिलंय की,'पण ही का परफॉर्म करतेय?ही बिग बॉसच्या कोणत्या सिझनमध्ये होती का?' अशाच वेगवेगळ्या कमेंट वाचायला मिळत आहेत.

हेही वाचा: Gandhi Godse Ek Yudh: विचारांचं युद्ध मोठ्या पडद्यावर..चिन्मय मांडलेकर साकारणार नथुराम गोडसे

माहितीसाठी थोडं सांगतो की, अर्चना गौतम,अब्दू रोझिक आणि निमृत तसंच शिव ठाकरे यंदाच्या सिझनचे दमदार स्पर्धक मानले जात आहेत. शो ची टीआरपी देखील वाढली आहे आणि या चौघांपैकी कोणीही बिग बॉसची ट्रॉफी पटकावेल बोललं जात आहे.