
Bigg Boss: 'या केवळ अफवा', प्रियांकाने सोडलं मौन
प्रियांका चहर चौधरी ही बिग बॉस 16 ची फायनलिस्ट होती, ती ट्रॉफी जिंकण्यापासून चुकली असेल, परंतु तिने तिच्या खेळाने आणि शानदार व्यक्तिमत्त्वाने लाखो मनं जिंकली आहेत. प्रियांका बिग बॉसच्या घरातील सर्वात मजबूत खेळाडू बनली आणि तिने नेहमीच चुकीच्या विरोधात आवाज उठवला.
सलमान खाननेही प्रियांकाच्या सौंदर्याची, फिगरची आणि उत्तम ड्रेसिंग सेन्सची अनेकदा प्रशंसा केली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर प्रियांका सलमान खान आणि शाहरुख खानसोबत चित्रपट करू शकते, अशीही बातमी समोर आली होती. आता या बातमीवर प्रियांकाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
खरं तर, जेव्हा प्रियांका बिग बॉस 16 च्या घरात उपस्थित होती, तेव्हा बातमी समोर आली होती की तिला शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे.
इतकेच नाही तर प्रियांकाला सलमान खानसोबत एक चित्रपटही मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या. वीकेंड का वारच्या एका एपिसोडदरम्यान, शो संपल्यानंतर सलमान खानने प्रियांकाला भेटायला सांगितले होते.
आता प्रियांका बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिने या बातम्यांवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांकाने म्हटले आहे की, "मला शाहरुख खान सरांच्या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नाही कारण मी नुकतीच बाहेर आले आहे आणि अजून कोणाशीही बोलले नाही".
"होय, सलमान सरांनी मला शोनंतर भेटायला सांगितले, पण त्यापेक्षा जास्त काही नाही. प्रियंका म्हणाली- 'शाहरुख आणि सलमान सर दोघेही माझ्यासाठी देवासारखे आहेत. सध्या माझ्याकडे ऑफर्सबद्दल कोणतीही माहिती नाही".
जेव्हा प्रियांकाला विचारण्यात आले की ती टीव्हीमध्ये काम करणे सुरू ठेवणार आहे का?, तेव्हा अभिनेत्री म्हणाली- "मला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर मी टीव्हीमध्ये काम करत राहीन. मी कोणत्याही माध्यमात काम करू शकते. माझ्या मनात कोणतीही कॅटेगिरी नाही. मला जे काम आवडेल ते मी करेन, मग ते शो असो, चित्रपट असो किंवा वेब सिरीज".
आता बिग बॉस 16 मधून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकाला बॉलिवूडमधून काय ऑफर मिळतात हे पाहावं लागेल. तसे, याआधीही सलमान खानने बिग बॉसच्या अनेक खेळाडूंचे नशीब उजळवले आहे. लवकरच या यादीत प्रियंका चहर चौधरीचेही नाव येऊ शकते.