Bigg Boss 16: बिग बॉसचं घर आहे की पाकिस्तान.. 50 हजाराचं पीठ, 70 हजाराची भाजी.. रेशन पडलं महागात!

बिग बॉस हिन्दीचे 16 वे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे.
Bigg Boss 16 ration task high rate goods inflation task for prize money
Bigg Boss 16 ration task high rate goods inflation task for prize money sakal

bigg boss 16: बिग बॉस16 शोचा आता शेवटचा टप्पा जवळ आला आहे. कारण फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात या खेळाची अंतिम फेरी रंगणार आहे. त्यामुळे रोज नवीन काहीतरी राडा या घरात सुरू आहे आणि रोज काहीतरी नवीन बघायला मिळतं आहे. पण आता ही खेळ चांगलाच कठीण होऊन बसलाय. रेशन मिळवण्यासाठी घरातील रहिवाशांना आता बक्षीसाची रक्कम गमवावी लागणार आहे. त्यामुळे घरात मोठा राडा झाला आहे. (Bigg Boss 16 ration task high rate goods inflation task for prize money )

Bigg Boss 16 ration task high rate goods inflation task for prize money
Kedar Shinde: पन्नाशीची उमर गाठली.. वाढदिवासानंतर केदार शिंदे यांची भावनिक पोस्ट..

झालं असं की, बिग बॉसने घरच्यांना लागणाऱ्या रेशनवर पैसे आकरले आणि या रेशनची किंमत लाखो रुपये ठेवली. या रेशनमध्ये 50 हजार रुपये किलोने पीठ मिळत आहे. तर भाजीची किंमत 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यावेळी रेशनचे किंमत पाहता येथे रेशन नव्हे तर सोने विकले जात असल्याचे दिसते. ही रेशन खरेदी करण्यासाठी स्पर्धकांनी 8 लाख 20 हजार रुपये दिले. पण ही रक्कम त्यांच्या बक्षिसाच्या रकमेतून वजा होणार असल्याने 8 लाख 20 हजार रुपये स्पर्धकांनी गमावले आहेत. त्यामुळे आता बक्षीसाची रक्कम म 21 लाख 80 हजार झाली आहे.

त्यातच या महागाईच्या रेशन टास्कवरून शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ' शिव अर्चनाला बोलतो तुझे विचार खुप बेकार आहेत. तुला लाज वाटली पाहिजे. तर अर्चना बोलते, जो जास्त खातो तो बोलतो..'

(shiv and archana fight )

यामध्ये रेशनमुळे घरातील सदस्य काही काळ नाराजही झाले. शिवाय त्यांच्यात वादही झाले. हा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या पाकिस्तान मध्ये प्रचंड महागाई आहे, त्यामुळे बिग बॉस च्या घराचे पाकिस्तान झाले की काय अशी खिल्ली नेटकऱ्यांनी उडवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com