
Netizens get furious on Sajid Khan entry in Salman Khan show: बिग बॉसचा नवा सीझन आता सुरु झाला आहे. नेहमीप्रमाणे या शो ला चाहत्यांचा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी देखील सहभागी स्पर्धकांमध्ये काट्याची टक्कर असणार आहे. मात्र यंदाच्या सीझनमध्ये जे स्पर्धक सहभागी झाले आहेत ते त्यांच्या काँट्रोव्हर्सीमुळे जास्त चर्चेत आले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता साजिद खान बिग बॉसमध्ये जाणार असल्याचे बोलले जात असतानाच त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. Netizens get furious on Sajid Khan entry in Salman Khan show Bigg Boss 16
साजिदची बिग बॉसमधील इंट्री ही अनेकांच्या भुवया उंचावणारी बाब ठरली आहे. त्यामुळे नेटकरी संतापले आहे. त्यांनी बिग बॉसविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या दिग्दर्शकावर काही अभिनेत्रींनी गंभीर आरोप केले आहेत त्याला आता बिग बॉसमध्ये सहभागी करुन घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी मेकर्सला विचारला आहे. त्यावरुन सध्या सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. या वादात टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलनं साजिदची बाजू घेतल्यानं तिला ट्रोल करण्यात आले आहे.
तू कशाला त्याची बाजू घेते आहेस असा प्रश्न नेटकऱ्यांनी शहनाजला विचारण्यास सुरुवात केली आहे. साजिदच्या बाजुनं बोलणं हे शहनाजला महागात पडताना दिसते आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर फराह खानचा भाऊ असणाऱ्या साजिदवर काही अभिनेत्रींनी मी टू चे आरोप केले होते. त्यामुळे तो भलताच चर्चेतही आला होता. त्याचा परिणाम म्हणजे साजिद हा बराच काळ बॉलीवूड इंडस्ट्रीपासून लांब असल्याचे दिसून आले आहे.
यासगळ्यात साजिद मात्र ट्रोल होतो आहे. त्याला काही झालं तरी बिग बॉसमध्ये इंट्री मिळू नये अशी भूमिका नेटकऱ्यांनी घेतली आहे. यावर काही टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी त्याची बाजू घेणं यामुळे मात्र मोठा वाद सुरु झाला आहे. साजिदला आपली डागाळलेली प्रतिमा बिग बॉसच्या निमित्तानं पुन्हा एकदा चांगली करायची असल्यानं त्याचा बिग बॉसमध्ये येण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत अशा व्यक्तीला बिग बॉसमध्ये घेऊ नये यावर नेटकरी ठाम आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.