Bigg Boss 16: शिव ला पुन्हा धक्का! साजिद घराबाहेर...घरातले नाराज मात्र नेटकरी जोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sajid Khan

Bigg Boss 16: शिव ला पुन्हा धक्का! साजिद घराबाहेर...घरातले नाराज मात्र नेटकरी जोमात

बिग बॉस16 या शोचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे कारण अंतिम फेरी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. बिग बॉस 16 या सीझनने यावेळी प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा केली आहे. शोमध्ये लोक त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना खूप सपोर्ट करताना दिसत आहेत. पण आता चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. शिव स्टार, अब्दू,निमृत, सुंबुल यांच्या मंडळीतून आता अजून एक सदस्य बाहेर पडणार आहे.

शोच्या नवीन प्रोमोनुसार साजिद खान घराबाहेर जाणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात नॉमिनेशनची नावे वेगळी होती पण बिग बॉसने वेगळाच खेळ खेळला . या आठवड्यात, दोन स्पर्धक सृजिता जे आणि अब्दू रौजिक यांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या टोळीचा मास्टर माइंड साजिद खानही बेघर होणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसने साजिदला खास निरोप दिल्याचे दिसून येते.

प्रोमोमध्ये बिग बॉस साजिदला त्याच्या प्रवासाबद्दल बोलतो आणि त्याच्या कामाचे कौतुकही करतो असे या प्रोमोमध्ये दिसून येते. त्याचवेळी साजिद खान खूप भावूक होतो आणि सर्वांना सांगतो की जर त्याने कोणाचे मन दुखवले असेल तर त्याला माफ करा. साजिद खानचे घरातील सर्वांशी भांडण झाले तरी चालेल. मात्र त्याच्या जाण्याने सर्वांचेच डोळे पाणावले. साजिदच्या जाण्याने सर्वजण खूप निराश दिसत होते.

हेही वाचा: Neil Nitin Mukesh Birthday: नील नितीन मुकेश प्रेमात झाला होता वेडा, दीपिकाच्या घरासमोर 3 तास...

तर दुसरीकडे, मंडळीतील लोक म्हणजे शिव, निमृत आणि सुंबुल यांना खुप वाईट वाटले आहे .हा प्रोमो खूपच भावनिक आहे. पाहिले तर सुरुवातीला अनेक सोशल मीडिया वापरकर्ते साजिदला बाहेर जाण्यासाठी प्रार्थना करायचे. मात्र हा प्रोमो पाहिल्यानंतर सगळेच भावूक झाले आहेत. आधीच अब्दुच्या जाण्याने मंडळी त्या वेदनातून बाहेर पडू शकली नाही. अशा स्थितीत साजिदच्या जाण्याने सर्वजण आता खूपच निराश झाले आहे.