Bigg Boss 17 House: असं असेल बिग बॉसच्या 17 व्या सिझनचं आलिशान घर! व्हिडिओ व्हायरल

The video went viral of New season luxury home: बिग बॉसच्या 17
Bigg Boss 17 House
Bigg Boss 17 HouseEsakal

Bigg Boss 17 House: टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. आता या शोचा पुढचा सिझन 17 टीव्हीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमान खान होस्ट करत असलेला हा शो 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासुन या शोच्या स्पर्धकांच्या नावाबद्दल चर्चा सुरु आहे.

Bigg Boss 17 House
The Vaccine War Collection : नानांच्या 'व्हॅक्सीन वॉर'नं टाकली मान! पाचव्या दिवशीच आली सलाईन लावण्याची वेळ

तर या शो मधील स्पर्धक. शोची थीम आणि यावेळी बिग बॉसचं घर कसं असेल याबाबत चाहत्यांना उत्सूकता लागली आहे. त्यातच शोचे निर्माते देखील या शोबद्दल रोजच नवनवीन अपडेट देत आहेत.

यात सलमान खानने या शोचा प्रोमो दाखवला होता. यात सलमान खान तीन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसला होता. आता या शोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता बिग बॉसच्या घराचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Bigg Boss 17 House
Raavsaheb Teaser: "देशाची सिस्टीम बिघडली की.." मुक्ता बर्वेच्या 'रावसाहेब'चा अंगावर काटा आणणारा टीझर

'बिग बॉस'च्या सेटवरुन हा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात बिग बॉसच्या नवीन घराची एक झलक दिसत आहे. घराचा सेट तयार करण्याचे काम सुरु आहे.

मात्र यावेळी बिग बॉसचे घर खूपच आलिशान हवेली सारखे असणार आहे. असा अंदाज चाहते लावत आहे. बिग बॉसच्या घराची थीम ही दरवर्षी बदलत राहते. तर यावेळी कशी थीम असणार हे जाणुन घेण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.

Bigg Boss 17 House
Yodha New Release Date: शाहरुखच्या 'डंकी' अन् प्रभासच्या 'सालार'ला 'योद्धा' घाबरला! करणने घेतली माघार?

यावेळी बिग बॉसचा सिझन खुपच मनोरंजक आणि वेगळ्या थीमचा असणार आहे, यात कपल व्हर्सेस सिंगल अशी थीम असेल.

तर या सीझनमध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन मुनावर फारूक, शीझान खान, अरमान मलिक, ईशा मालवीय आणि फैझल अशा बऱ्याच सदस्यांच्या नावाची चर्चा आहे. आता या घरात कोण बंद होणार हे तर 17 तारखेलाच समजेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com