Bigg Boss 17: स्पर्धकाला घराबाहेर काढल्याने 'बिग बॉस'ला मिळाली धमकी, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

बिग बॉसचा आवाज देणाऱ्या अभिनेत्याला धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत
Bigg Boss 17 voice vijay vikram singh threat after eviction of a contestant
Bigg Boss 17 voice vijay vikram singh threat after eviction of a contestantSAKAL

टेलिव्हि़जनवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसचा 17 सध्या सुरु आहे. बिग बॉस हा असा रिअॅलिटी शो आहे की ज्याचे आजवरचे सर्व सीझन सुपरहिट झाले आहेत.

बिग बॉसमधील अनेक स्पर्धकांवर लोकांनी भरभरुन प्रेम केलंय. मग तो शिव ठाकरे असो, तेजस्वी प्रकाश असो वा श्वेता तिवारी. पण एक अशी बातमी समोर येतेय जी वाचुन तुमच्या भुवया उंचावतील.

एका स्पर्धकाला घराबाहेर काढल्याने बिग बॉसचा आवाज असणाऱ्या अभिनेत्यालाच धमकी मिळाल्याची घटना घडली. बिग बॉसचा आवाज असणाऱ्या विजय विक्रम सिंगने याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला.

(Bigg Boss 17 voice vijay vikram singh threat after eviction of a contestant)

Bigg Boss 17 voice vijay vikram singh threat after eviction of a contestant
Nana Patekar: बाप कायम गंभीर! मात्र माझा... सिद्धार्थ सांगणार बाबाची कहाणी! 'ओले आले'चा भन्नाच टिझर बघाच

बॉलीवूड बबल या मिडीया चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाला, "गेल्या दोन वर्षांत, एका लोकप्रिय स्पर्धकाला बाहेर काढल्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अनेक धमक्या आल्या आहेत."

विजय पुढे म्हणाला, “मला लोकांना सांगायचे आहे की बिग बॉसचे दोन आवाज आहेत. पण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी फक्त प्रेक्षकांशी संवाद साधणारा आवाज आहे. माझा आवाज फक्त घरातली वेळ सांगतो. आणि घरात त्या त्या दिवशी काय घडले हे मी दर्शकांना सांगतो. स्पर्धकांशी थेट संवाद साधणारा आवाज हा वेगळा आहे. मी लोकांना सांगत असतो की मी शोमध्ये निवेदकाचा आवाज आहे,” तो म्हणाला.

विजयने नमूद केले की, “गेल्या दोन वर्षांत, जेव्हा एखादा स्पर्धक घराबाहेर जातो तेव्हा त्याला काढल्यामुळे माझ्यावर ऑनलाइन टिका करण्यात आली आहे. मी त्यांना सांगतो की, ही लोकांची मते आहेत. पण ते माझे ऐकत नाहीत. या सर्व प्रकारात लोकांनी माझ्या कुटुंबाला ओढले आणि आम्हा सर्वांना धमक्यांचे फोन येऊ लागले,” तो म्हणाला.

विजयने स्पष्ट केले की, "तो बिग बॉसचा मूळ आवाज नसून तो दुसरा आवाज आहे. बिग बॉसला आवाज देणारा व्यक्ती त्यांचं काम करत आहे. त्यामुळे अशा धमक्या येणं हे चुकीचं आहे." असा खुलासा विजयने केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com