बिग बॉस फेम अर्शीला अपघात, गंभीर जखमी ; रुग्णालयात केलं दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिग बॉस फेम अर्शीला अपघात, गंभीर जखमी ;  रुग्णालयात केलं दाखल
बिग बॉस फेम अर्शीला अपघात, गंभीर जखमी ; रुग्णालयात केलं दाखल

बिग बॉस फेम अर्शीला अपघात, गंभीर जखमी ; रुग्णालयात केलं दाखल

मुंबई - बिग बॉस फेम टीव्ही कलाकार अर्शी खान ही सध्या चर्चेत आली आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ती म्हणजे तिच्या कारला अपघात झाला असून त्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे. दिल्लीतील मालवीय नगरमध्ये ही घटना घडली. याप्रकारामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तिला एका रुग्णालयामध्ये दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

बिग बॉसमध्ये आपल्या परफॉर्मन्सनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी स्पर्धक म्हणून अर्शी खानची ओळख आहे. तिनं त्यावेळी अनेकांची पसंती मिळवली होती. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारी अर्शी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिनं सोशल मीडियावर खली सोबत डान्स करतानाचा एक व्हिड़िओ अपलोड केला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावेळी चाहत्यांनी तिच्या या व्हिड़िओला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. यापूर्वी अर्शीनं काही मनोरंजन मालिकेत कामं केली आहेत.

अर्शीला खरी ओळख बिग बॉसमधून मिळाली आहे. अर्शी काही दिवसांपासून ग्रेट खली पासून कुस्तीचे धडे घेत आहे. आपल्या ट्रेनिंगचे व्हिडिओ देखील तिनं यापूर्वी शेयर केले आहेत. याशिवाय अर्शी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी तिला नागरिकता देण्यावरुन ट्रोल करण्यात आले होते. यावेळी तिनं तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झाडले होते.

loading image
go to top