Chalaki Chanti: बिग बॉस मधील लोकप्रिय अभिनेत्याला हार्ट अटॅक, ICU मध्ये उपचार सुरु

हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले
Chalaki Chanti Passed Away, Chalaki Chanti  health update, Chalaki Chanti
Chalaki Chanti Passed Away, Chalaki Chanti health update, Chalaki Chanti SAKAL

Chalaki Chanti News: तेलगू कॉमेडी अभिनेता चालकी चंती यांना शनिवारी, 22 एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीने हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाला वैद्यकीय बुलेटिन मिळालेले नाही. त्याच्या तब्येतीबद्दल त्याच्या मित्रांनी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणतीही अपडेट शेअर केलेली नाही.

(bigg boss fame popular telgu actor chalaki chanti suffered heart attack)

चालाकी चंटीचे खरे नाव विनय मोहन आहे. विनयने आपल्या करिअरची सुरुवात मिमिक्री करत केली आणि आज तो त्याच्या कॉमेडी आणि मिमिक्री कौशल्यासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो. बिग बॉस तेलुगु 6 या रिअॅलिटी शोमध्येही तो सहभागी होता. चंटीने टँक बंड टुरिस्ट बोट ट्रिपमध्ये माइम करायला सुरुवात करण्यापूर्वी टाटा इंडिकॉमसाठी काम केले.

Chalaki Chanti Passed Away, Chalaki Chanti  health update, Chalaki Chanti
Aryan Khan - Anannya Pande Video: पप्पाच्या परीला मॅच कळेना! शाहरुखचा लेक समजवतोय अनन्याला मॅच.. मजेशीर व्हिडिओ व्हायरल

रेडिओ मिर्चीमध्ये आरजे म्हणून रुजू झाल्यानंतर त्याच्या 'चंटी बंटी' या शोने त्याला चंटी हा मान मिळवून दिला. जल्लू या चित्रपटाद्वारे चंटीने टॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु दुर्दैवाने, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केली. तो आता 50 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला आहे.. भीमली कबड्डी जट्टूने सिनेमाने त्याला खरी प्रसिद्धी मिळवून दिली.

Chalaki Chanti Passed Away, Chalaki Chanti  health update, Chalaki Chanti
Sachin Tendulkar Birthday: सचिन तेंडुलकर लता मंगेशकरांना 'या' नावाने हाक मारायचा

ईटीव्ही वरील लोकप्रिय शो 'जबरदस्थ' तसेच बिग बॉस तेलुगु 6 मध्‍ये तो दिसला होता. त्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी व्हायरल झाल्यापासून त्याचे चाहते त्याच्यासाठी हृदयस्पर्शी संदेश पोस्ट करत आहेत. आशा आहे की अभिनेता चंटी लवकरच बरा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com