'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे बनला उद्योजक; पाहा व्हिडीओ

स्वाती वेमूल
Monday, 15 February 2021

याआधी सई ताम्हणकर, अपूर्वा नेमळेकर, क्रांती रेडकर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही स्वत:चा वेगळा व्यवसाय सुरू केला आहे.

'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरेनं आता स्वत:चा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. शिवने त्याचा डिओडरंट ब्रँड लाँच केला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.   

'माझा पहिला ब्रँड- बी रिअलला लाँच करण्यासाठी मी फार उत्सुक आहे. सकारात्मक जीवन जगण्याच्या मनुष्याच्या जिद्दीला बी. रिअल हा ब्रँड हा सलाम करतो. माझ्याकडे आधीच काही प्रॉडक्ट्स तयार आहेत, पण तुमच्याकडेही प्रॉडक्ट्ससाठी काही कल्पना असल्यास मला नक्की कळवा', असं शिवने व्हिडीओ पोस्ट करत लिहिलंय. त्याच्या या नव्या व्यवसायासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

हेही वाचा : बेडरुममधले सिक्रेट कोण सांगतं का? पण राजनं सांगितलं

याआधी सई ताम्हणकर, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, निवेदिता सराफ, आरती वडगबाळकर, क्रांती रेडकर, अपूर्वा नेमळेकर या सेलिब्रिटींनीही अभिनयाव्यतिरिक्त स्वत:चा वेगळा व्यवसाय सुरू केला. सई ताम्हणकरने नुकताच साड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. 

हेही वाचा : सई म्हणते, आदित्य मला साडी नेसवायला मदत कर

अमरावती जिल्ह्यात लहानाचा मोठा झालेल्या शिव ठाकरेला नृत्य दिग्दर्शक व्हायचं होतं. नृत्य दिग्दर्शक म्हणून काही काळ काम केल्यानंतर शिव रिअॅलिटी शोकडे वळला. 'एमटीव्ही रोडीज' या रिअॅलिटी शोमुळे त्याला चांगली लोकप्रियता मिळाली. डान्सची प्रचंड आवड असलेला शिव अजूनही पुण्यात डान्सचे क्लासेस घेतो. 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्याचं वीणा ठाकरेशी नातं जुळलं. या दोघांनी अधिकृतरित्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss Marathi 2 winner Shiv Thakare turns an entrepreneur